आता उत्सुकता ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६’ची
By admin | Published: June 11, 2016 01:49 AM2016-06-11T01:49:12+5:302016-06-11T01:49:12+5:30
उत्कंठा शिगेला पोहोचविणारे प्रदर्शन ज्यामध्ये एकाच छताखाली मिळणार आहे
पिंपरी : उत्कंठा शिगेला पोहोचविणारे प्रदर्शन ज्यामध्ये एकाच छताखाली मिळणार आहे, परिपूर्ण मार्गदर्शन आणि करिअरच्या दिशा निश्चित करण्याचा मार्ग. दहावी-बारावीचा निकाल नुकताच लागला आहे. भविष्यात काय करायचे, ते पक्के ठाऊक असले, तरी कोणता कोर्स कुठून करावा, याबाबतचा गोंधळ दूर करणाऱ्या व सर्वांनाच उत्सुकता असलेल्या ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६’ला शनिवारपासून सुरुवात होत आहे.
चिंचवड येथील आॅटो क्लस्टर येथे १२ जूनपर्यंत सकाळी ९.३० ते सायंकाळी ७पर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते होणार आहे़ या वेळी प्रायोजक आणि प्रियदर्शनी स्कूलचे प्रमुख राजेंद्र सिंह, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई उपस्थित राहणार आहेत. केवळ बारावीच्याच नव्हे, तर सर्वच विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरणार आहे. कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. (प्रतिनिधी)
>दहावी, बारावीतील गुणवंतांचाही होणार गौरव
प्रदर्शनास भेट देणाऱ्या दहावी व बारावीत यश मिळविणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाईल.
महाविद्यालये, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, फॅशन, ग्राफिक्सपर्यंतची माहिती इथे मिळेल. विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, हॉटेल मॅनेजमेंट, फॉॅरिन लॅँग्वेजेस, स्पोकन इंग्लिश, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचा सहभाग.
प्रदर्शनात प्रवेश आणि पार्किंग सर्वांसाठी मोफत असून, प्रदर्शनास भेट देऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.