आषाढी वारीवर आता एफडीएची नजर

By admin | Published: July 6, 2015 02:01 AM2015-07-06T02:01:49+5:302015-07-06T02:01:49+5:30

आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने चांगले अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) यंदा वारीतील खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे.

Now the FDA's eye on the Ashadhi Vari | आषाढी वारीवर आता एफडीएची नजर

आषाढी वारीवर आता एफडीएची नजर

Next

मुंबई : आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने चांगले अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) यंदा वारीतील खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे.
दरवर्षी लाखो वारकरी वारीत सहभागी होतात. या वारकऱ्यांच्या नाश्ता, जेवणाची सोय अनेक सेवाभावी संस्था, गावकरी, ट्रस्ट, सार्वजनिक मंडळे करीत असतात. या काळात सर्व वारकऱ्यांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी सर्व खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येणार असल्याचे एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वारीसाठी दरदिवशी सहा अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, या सर्व तपासणीवर सहआयुक्त दर्जाचा अधिकारी नजर ठेवणार आहे. (प्रतिनिधी)

पुण्यापर्यंत वारीवर विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे. पुण्यानंतर जिल्हास्तरीय अधिकारी वारीतील अन्नपदार्थांवर लक्ष ठेवतील. पुण्यात पालख्या एकत्र येत असल्याने पुण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
- डॉ. हर्षदीप कांबळे,
आयुक्त, एफडीए

Web Title: Now the FDA's eye on the Ashadhi Vari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.