आता पाय मोकळा करून घेतला - मुख्यमंत्री

By admin | Published: February 18, 2017 02:02 AM2017-02-18T02:02:57+5:302017-02-18T02:02:57+5:30

भाजपा स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात आहे. विकासाचा मुद्दा घेऊन आपण लोकांमध्ये जात आहोत, त्यामुळे या निवडणुकीत

Now the feet have been freed - Chief Minister | आता पाय मोकळा करून घेतला - मुख्यमंत्री

आता पाय मोकळा करून घेतला - मुख्यमंत्री

Next

अकोला : भाजपा स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात आहे. विकासाचा मुद्दा घेऊन आपण लोकांमध्ये जात आहोत, त्यामुळे या निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळेल, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे. आता पाय मोकळा करून घेतला आहे. तो पुन्हा अडकविण्याची वेळ येणार नाही, याची काळजी घ्या. तुम्ही मला मनपा द्या, मी तुम्हाला विकास, परिवर्तनाचा शब्द देतो, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे व महापौर उज्ज्वला देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी शरद पवार, अजित पवार व राहुल गांधी यांचे पक्ष दिवाळखोरीत निघाल्याचे सांगतानाच भाजपा हा एक सक्षम पर्याय असल्याचे ते म्हणाले. या बँका परतावा तर देत नाहीच; मात्र मुद्दलही फस्त करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. मतदानरूपी डिपॉझिट भाजपाला दिले, तर पाच वर्षांत पाचपट विकासाचे व्याज देऊन मुद्दलही परत करण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. भाजपा सरकारने दमदार कामगिरी करीत शहराच्या विकासाचा आलेख उंचावला असल्याचे ते म्हणाले.
विदर्भातील महापालिकांपैकी नागपूरमध्ये विकासाची घोडदौड सुरू आहे; परंतु अकोला, अमरावती व चंद्रपूर या महापालिकांना अजूनही विकासाची आस आहे. या विदर्भाचा भूमिपूत्र आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. आतापर्यंत राज्याच्या एकाच भागाला निधी जात होता. आता तो अन्याय दूर करीत आहोत. राज्याच्या सर्वच भागांचा विकास झाला पाहिजे, यासाठी आपण कटिबद्ध आहोतच; परंतु आतापर्यंत ज्या भागाला विकास निधी देताना हात आखडता घेतल्या गेला, तेथे विकासाचा अधिक निधी जात असेल, तर कोणाच्या पोटात दुखता कामा नये, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

Web Title: Now the feet have been freed - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.