आता पंचतारांकित डान्सबारही रडारवर
By admin | Published: June 8, 2014 02:21 AM2014-06-08T02:21:37+5:302014-06-08T02:21:37+5:30
डान्सबार बंदीचे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्याचा निर्णय शनिवारी विधिमंडळाच्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
Next
>मुंबई : डान्सबार बंदीचे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्याचा निर्णय शनिवारी विधिमंडळाच्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. डान्सबार बंदीचा र्सवकश कायदा करताना त्यात पंचतारांकित आणि चार तारांकित हॉटेलांमधील डान्सबारवरही बंदी आणायची असे ठरविण्यात आले.
शनिवारी संसदीय कार्यमंत्नी हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. त्यात कोणत्याही परिस्थितीत डान्सबार बंदी केली जावी, अशी भूमिका गटनेत्यांनी घेतली. तसेच हे विधेयक विधिमंडळाच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचे ठरविण्यात आले, असे सूत्रंनी सांगितले. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शिकेनुसार सर्व कायदेशीर बाबींवर खल करून हे सुधारित विधेयक मंजुरीसाठी गृहविभागाकडे पाठवण्यात येणार आहे. संयुक्त चिकित्सा समितीकडे हे विधेयक गेल्यामुळे डान्सबार बंदीचा कायदा या अधिवेशनात होणार नाही. त्यामुळे असा कायदा आघाडी सरकार संधी असूनही करू शकले नाही, अशी टीका विरोधकांकडून विधानसभा निवडणूक प्रचारात केली जाऊ शकते. डान्सबार बंदीचा कायदा लगेच येणार नसला तरी डान्सबारना नूतनीकरणाचे परवाने देणो बंद आहे. तेच धोरण कायम ठेवण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. त्यामुळे डान्सबार सुरू होण्याची शक्यता नाही.