आता येणार फ्लार्इंग कार; निपाणीच्या उद्योजकाने केले मॉडेल विकसित

By admin | Published: December 13, 2014 12:36 AM2014-12-13T00:36:07+5:302014-12-13T00:40:41+5:30

आता येणार फ्लार्इंग कार; निपाणीच्या उद्योजकाने केले मॉडेल विकसित

Now the Flying Car; The footwear industry develops models made by them | आता येणार फ्लार्इंग कार; निपाणीच्या उद्योजकाने केले मॉडेल विकसित

आता येणार फ्लार्इंग कार; निपाणीच्या उद्योजकाने केले मॉडेल विकसित

Next

राजेंद्र हजारे - निपाणी  येथील महेश महाजन या ५२ वर्षीय काजू लघू उद्योजकाने चक्क फ्लार्इंग कारचे मॉडेल बनविले आहे.
चार व्यक्तींना घेऊन एक हजार ते बाराशे किलो वजनाची कार अंदाजे दहा लाख रुपयांत निर्माण करण्याचे स्वप्न वर्षभरातच पूर्ण होईल, असा विश्वास महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
महाजन यांना लहानपणापासूनच हवेत उडणारी खेळणी आणि पक्षी यांचे आकर्षण होते; परंतु एम. बी. ए.चे शिक्षण घेईपर्यंत त्यांनी याबाबत गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर विविध माध्यमातून हवेत उडणाऱ्या कारविषयी ऐकून त्यांनी अशी कार बनविण्याचे ठरविले आणि पत्नी सुरेखा, मुलगी वैष्णवी आणि मुलगा विवेक यांच्या सहकार्याने इंटरनेटच्या माध्यमातून माहिती संकलित केली.
विमानाशी साधर्म्य असणाऱ्या या कारसाठी ए.व्ही.०८ बी. हरेर या विमानाची कन्सेप्ट डोक्यात ठेवून इंजिन, इलेक्ट्रॉनिक पार्ट, कंट्रोल बोर्ड आणि गॅस टर्बाईनचा वापर करून केवळ इंधन आणि स्वीचवर चालणारी कार बनविण्याचे ठरविले. २६ सप्टेंबर २०१२ ला चेन्नईला पहिल्या पेटंटसाठी अ‍ॅप्लिकेशन दिले होते.
महाजन यांनी बनविलेले मॉडेल आठ किलो वजनाचे असून, बॅलन्ससाठी दहा छिद्रे त्याला बनविण्यात आली आहेत. बुस्टरमधून खेचलेली हवा या छिद्रांतून समानरीत्या बाहेर पडते. मॉडेलची उंची दीड फूट असून, घेर अडीच फुटांचा आहे. त्याला ०८ डक्टेक्ट फॅन बसविले असून, ५० हजार आर.पी.एम. (रोटेशन पर मिनिट) अशी या प्रत्येकी फॅन्सची क्षमता आहे. सध्या रिमोटवर या मॉडेलचे कंट्रोल होते. घरातील इतर कामे सांभाळत महाजन यांनी या कारसाठी इंटरनॅशनल पब्लिकेशन नंबर डब्ल्यू ओ २०१४/०४९६०७ मिळविला आहे.
प्रत्यक्षात ही कार चार माणसांसह हजार ते बाराशे किलो वजनाची असेल. कारची १० बाय १० फूट रुंदी आणि ७ ते ८ फूट उंची असेल. विमान, हेलिकॉप्टरप्रमाणे याला मर्यादा नाही. वादळातही ही कार हवेतून धावू शकेल. एकाच जाग्यावरून थेट हवेत जाऊन पाहिजे तशी सरकवता येते. गल्ली-बोळात, अरुंद अडचणीच्या जागेत आणि अंडरग्राऊंड पार्किंगही या कारने सुलभर[त्या करता येते. चालक मध्यभागी तर बॅलन्ससाठी तीन प्रवासी बसण्याची व्यवस्था असेल, असेही महाजन यांनी सांगतले.


१६० देशात पेटंट मागण्यास परवानगी
दीड वर्ष खर्ची घालून बनविलेल्या या मॉडेलला चेन्नई पेटंट कार्यालयाने २६ सप्टेंबर २०१२ रोजी मान्यता देऊन त्यांच्याच माध्यमातून आंतरराष्ट्रीय सर्च रिपोर्ट दिला आहे. त्यांनी ‘एअर थर्स्ट व्हेईकल’ नावाने रजिस्ट्रेशन करून जगातील १६० देशांत पेटंट मागविण्यास परवानगी दिली आहे.

Web Title: Now the Flying Car; The footwear industry develops models made by them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.