स्टंटमॅनसाठी आता आरोग्य आणि अपघात विमा योजना

By admin | Published: April 25, 2017 01:34 PM2017-04-25T13:34:53+5:302017-04-25T13:46:04+5:30

अक्षय कुमारच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्ययही ब-याचदा आला आहे.

Now the Health and Accident Insurance Scheme for Stuntsman | स्टंटमॅनसाठी आता आरोग्य आणि अपघात विमा योजना

स्टंटमॅनसाठी आता आरोग्य आणि अपघात विमा योजना

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. मग ती शहिदांना मदत असो वा एखाद्या गरजू किंवा गरजवंताला केलेली मदत, नेहमीच अक्षय कुमार हा मदतीसाठी तत्पर असतो. अक्षय कुमारच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्ययही ब-याचदा आला आहे. तसेच त्यांच्या सामाजिक कार्यावर कोणीही शंका देखील उपस्थित करू शकत नाही.

सीमेवर लढणा-या जवानांबाबत तर त्याला फार आपुलकी आणि आत्मियता आहे, हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. अक्षय कुमारनं पुन्हा एकदा सामाजिक भान जपलं आहे. स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमार लवकरच स्टंटमॅन आणि स्टंटवूमनसाठी एक जीवन विमा सुरक्षा कवच घेऊन येणार आहे. या जीवन विमान योजनेनुसार स्टंटमॅनना जवळपास 10 लाख रुपयांपर्यंत विमा कवच प्राप्त होणार आहे. प्रसिद्ध कारडिअ‍ॅक सर्जन डॉ. रमाकांत पांडा हेही या योजनेत सहभागी झाले असून, या निमित्तानं अक्षय आणि पांडा एकत्र आले आहेत. या योजनेचा 18 ते 55 या वयोगटातील जवळपास 380 स्टंटमॅन आणि स्टंटवूमनला फायदा मिळणार आहे.

यावेळी पांडा म्हणाले, स्टंट करणा-या कलाकाराचं हृदय हे कठोर असतं. स्टंटमॅन हा चित्रपटातील खरा नायक असून, त्याचं चित्रपटाच्या यशात मोलाचा वाटा असतो. त्यामुळेच त्याला जीवन विमान सुरक्षा कवच मिळणे गरजेचे आहे. अक्षय हा माझा जवळचा मित्र आहे आणि तो एक स्टंट कलाकार असल्यामुळे त्याला चित्रपटसृष्टीतील स्टंटमॅनच्या वेदना माहीत आहेत. अक्षय कुमारच्या पाठिंब्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. डॉ. रमाकांत यांनी 2009मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे ऑपरेशन केले होते. त्याप्रमाणेच त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावरही शस्त्रक्रिया केली होती.तसेच अक्षय कुमारनंही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी पहिला स्टंटमॅन आहे आणि मग अभिनेता. माझा स्टंट आणि अभियन चित्रपटातील त्या भूमिकेनुसार बाहेर येतो, असा मला विश्वास आहे. याचं सगळं श्रेय क्रीडा नृत्य-दिग्दर्शक आणि स्टंट समुदायाला जातं. चित्रपटसृष्टीतील स्टंटमॅनची वेदना जाणून त्यांच्यासाठी जीवन विमा कवच आणणारे आणि त्या अभियानासाठी मला पात्र समजणारे डॉ. रमाकांत पांडा यांचा आभारी आहे, असंही अक्षय कुमार म्हणाला आहे.
 
या जीवन सुरक्षा विमा योजनेनुसार स्टंट करताना कोणतीही दुखापत झाली किंवा अपघात झाला तर स्टंटमॅनला रुग्णालयात उपचार घेण्यासाठी 6 लाखांचा विमा कॅशलेस पद्धतीने देण्यात येणार आहे. ही सुविधा जवळपास 4 हजार रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्टंट करताना जर एखाद्या स्टंटमॅन / स्टंटवूमनचा मृत्यू झाला तर त्यांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये देखील मिळणार आहेत. एकंदरीतच ही जीवन विमा योजना स्टंटमॅनसाठी लाभकारी सिद्ध होणार आहे.

Web Title: Now the Health and Accident Insurance Scheme for Stuntsman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.