आता माझी सटकली पण सत्ता कशी विसरली?

By admin | Published: September 19, 2014 02:30 AM2014-09-19T02:30:43+5:302014-09-19T02:30:43+5:30

अजितदादांचा फार्महाऊस. नेमका कुठला, लक्षात नाही. चित्रपट निर्माते अन् दिग्दर्शक त्यांना भेटायला आलेले.) दादा : बोला, कोणत्या मतदारसंघातून आलात तुम्ही?

Now I'm scared but forgot how the power? | आता माझी सटकली पण सत्ता कशी विसरली?

आता माझी सटकली पण सत्ता कशी विसरली?

Next
(स्थळ : अजितदादांचा फार्महाऊस. नेमका कुठला, लक्षात नाही. चित्रपट निर्माते अन् दिग्दर्शक त्यांना भेटायला आलेले.)
दादा : बोला, कोणत्या मतदारसंघातून आलात तुम्ही?
दिग्दर्शक : आम्ही ‘फिल्म कंपनी’वाले आहोत. ‘सिंघम तीन’ पिरसाठी तुमच्याकडे आलोय.
दादा : (नेहमीच्या घाईघाईनं) आता आचारसंहिता लागलीय. मी काही तुम्हाला अनुदान-बिनुदान देऊ शकत नाही. नंतर बघू.
निर्माता : (पी.ए.च्या कानात कुजबूजत) तुमच्या दादांना देण्या-घेण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का?
पीए : (लगेच सावरून घेत) तिजोरीची चावी आमच्या दादांच्याच हातात नां. त्यामुळं त्याच भाषेची सवय लागलीय. 
दिग्दर्शक : आम्ही ‘सिंघम तीन’ पिरमध्ये हिरो म्हणून तुम्हाला घ्यावं म्हणतोय. कोल्हापूरच्या सभेत म्हणो, तुम्ही ‘बाजीराव’चा लई भारी डॉयलॉग टाकला.
दादा : पण, पिरची स्टोरी काय? 
निर्माता : एक हिरो अन् सहा व्हिलन. 
दादा : (चुळबुळत) ही पात्रं तर माङया रिअल लाईफमध्येही आहेतच. ‘पृथ्वीराज, उध्दो, विनोद, देवेंद्र, राजू अन् महादेव’ हे सहाजण हात धुवून लागलेत माङयामागं. 
दिग्दर्शक : पण, ‘राज’चं नाव विसरलात की तुम्ही. 
पीए : नाही. नाही. नाशकात या स्टोरीमध्ये टि¦स्ट आलंय. दोघांमध्ये मस्त दिलजमाई झालीय. 
दादा : बरं.. पिरचं शूटिंग कुठं-कुठं होणार?
निर्माता : तुम्ही म्हणाल तिथं. मुळा नदीकाठावर किंवा उजनी धरणातही. 
दादा : (दचकून) नको. त्या दोन्ही ठिकाणी अगोदरच खूप राडा झालाय. त्यापेक्षा क:हाडच्या प्रीतिसंगमावर बघू. 
दिग्दर्शक : पण, तो ‘आत्मक्लेषाचा शॉट’ क्लायमेक्सला वापरायचाय. म्हणून पिरचा मुहूर्त आपण ‘जेल’मध्येच घेतला तर!
दादा : (रागारागानं) आताùù माझी सटकलीùù.
निर्माता : (कौतुकानं मान हलवत) येùùस्स. अगदी अश्शीùùच अॅक्टिंग हवीय आम्हाला तुमच्याकडून दादा. 
दादा : (अजून जास्त खवळत) आली रे आलीùù आता तुझी बारी आलीùù. आता मुकाटय़ानं बाहेर जाता का आबांना सांगून डिपार्टमेंट बोलावून घेऊ?
पीए : (हळूच) पण दादा. सध्या आचारसंहिता लागलीय. कोणीही येऊ शकणार नाही आपल्या मदतीला. मंत्रलयात तर साम्राज्य अधिका:यांचंच. 
दादा : (आवाज चढवत) थांब. माझी सत्ता येऊ दे.. मग बघ. शंभर दिवसांत सारे अधिकारी सरळ करतो.
दिग्दर्शक : (आश्चर्यानं) आँ. मग गेली पंधरा वर्षे सत्ता कुणाची होती? त्यावेळी का नाही केलात?
- सचिन जवळकोटे
 

 

Web Title: Now I'm scared but forgot how the power?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.