आता फोनवर मिळणार शहरातील प्रदूषणाची माहिती!

By admin | Published: July 14, 2015 01:33 AM2015-07-14T01:33:19+5:302015-07-14T01:33:19+5:30

मुंबापुरीला दिवसेंदिवस प्रदूषणाचा धोका वाढतोय, मात्र याबद्दल सामान्य मुंबईकर अनभिज्ञ आहे. या वाढत्या वायुप्रदूषणाची अचूक माहिती मुंबईकरांना

Now the information of the city pollution information! | आता फोनवर मिळणार शहरातील प्रदूषणाची माहिती!

आता फोनवर मिळणार शहरातील प्रदूषणाची माहिती!

Next

मुंबई : मुंबापुरीला दिवसेंदिवस प्रदूषणाचा धोका वाढतोय, मात्र याबद्दल सामान्य मुंबईकर अनभिज्ञ आहे. या वाढत्या वायुप्रदूषणाची अचूक माहिती मुंबईकरांना देण्यासाठी आता एका कॉलवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई शहर-उपनगरातील कोणत्याही भागातील वायुप्रदूषणाची मात्रा सामान्यांना टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
‘सफर’अर्थात सिस्टीम आॅफ एअर क्वॉलिटी अ‍ॅण्ड फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च या अ‍ॅप्लिकेशनचे काही दिवसांपूर्वी अनावरण करण्यात आले. या अ‍ॅपनेही अवघ्या काही दिवसांत दीड हजार डाउनलोड्सचा टप्पा पार केला. नव्याने सुरू होणाऱ्या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून आता वायुप्रदूषणाच्या पातळीबद्दल सामान्यांना माहिती मिळेल. ही सेवा येत्या १० दिवसांत मुंबईकरांच्या भेटीला येणार आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचे पूर्वानुमान आणि संशोधन करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनाही आपल्या परिसरातील हवेची परिस्थिती जाणून घेणे शक्य होणार आहे. यापूर्वी पुणे, दिल्ली शहरांत ही सेवा २०१३पासून सुरू झाली आहे. त्यात दिल्लीत महिन्याला जवळपास १५ हजार कॉल्स येतात; तर पुण्यात महिनाकाठी ४ हजार कॉल्सची नोंद करण्यात आली. भारतीय भू विज्ञान मंत्रालयाच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, प्रादेशिक हवामान खाते (पुणे) यांच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

‘सफर’ उपक्रमांतर्गत सुरू होणाऱ्या नव्या सेवेमुळे वाढत्या वायुप्रदूषणाबाबत मुंबईकर जागरूक होतील. या माध्यमातून वायुप्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. यामुळे विज्ञान क्षेत्राला नवीन दिशा मिळणार असून, या उपक्रमाचा भविष्यात आणखी विस्तार झाला पाहिजे.
- डॉ. गुफ्रान बेग, प्रकल्प संचालक

Web Title: Now the information of the city pollution information!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.