“… आता असेल ते केवळ पवार साहेब आणि दिल्लीतल्या मॅडमनी सेन्सॉर करून दिलेलं भाषण”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 10:34 AM2022-05-09T10:34:06+5:302022-05-09T10:38:08+5:30

सभेवरून भाजपचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला

"Now it will only be a speech censored by Pawar Saheb and Madam from Delhi" | “… आता असेल ते केवळ पवार साहेब आणि दिल्लीतल्या मॅडमनी सेन्सॉर करून दिलेलं भाषण”

“… आता असेल ते केवळ पवार साहेब आणि दिल्लीतल्या मॅडमनी सेन्सॉर करून दिलेलं भाषण”

Next

आगामी १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. “आता सभेला तर सुरुवात झालेलीच आहे, १४ तारखेला तर मी सभा घेतोच आहे, पण ही सभा म्हणजे उठसूठ इकडे वार तिकडे वार असं नाही करणार, जे काय माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझं काही तुंबलेलं नाही, पण मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत,” असं उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं होतं. शिवसेनेला हिंदुत्वावरून डिवचणाऱ्या भाजपा आणि मनसेचे हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या, भाजपा, मनसेवर तुटून पडा, असे आदेशच ठाकरे यांनी यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. यावरून आता भाजपनं उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“शिवसेनेचे पक्षप्रमुख १४ मे रोजी मुंबईत प्रचंड मोठी सभा घेणार आहेत म्हणे. त्याची जोरदार जाहिरातबाजीही सुरू करण्यात आलीय. एकेकाळी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आज हिंदुत्वाची जाहिरात करावी लागतेय, हे पाहून कीव कराविशी वाटली. त्यात आणखी खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकण्यासाठी यायलाय पाहिजे असं आमंत्रणही देताहेत. पण तुच्याकडे खरं हिंदुत्व राहिलंय कुठे?,” असा सवाल भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.


“ते शिवसेनाप्रमुखांच्या काळात होतं. पण तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागून ते हिंदुत्व कधीच सोडलंय. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनाप्रमुख आणि हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा करून त्या हिंदुत्वावरील हक्क तुम्ही गमावून बसलाय. आता उरलीय ती केवळ सत्ता राखण्यापुरतीची अगतिकता. गेल्या अडीच वर्षांत पालघरमध्ये साधूंची झालेली हत्या, रझा अकादमीच्य गुंडांनी केलेला हिंसाचार आणि आता गाजत असलेल्या भोंग्यांच्या विषयात ती वारंवार दिसलीय. त्यामुळे आता तुम्ही कसला हिंदुत्वाचा हुंकार ऐकवणार, आता असेल ते केवळ पवार साहेब आणि दिल्लीतल्या मॅडमनी सेन्सॉर करून दिलेलं भाषण. त्यातून तुम्ही कसला हिंदुत्त्ववादी विचार मांडणार? आणि तो कोण ऐकणार?,” असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला.

Web Title: "Now it will only be a speech censored by Pawar Saheb and Madam from Delhi"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.