आता ‘रासप’चे एकला चलो रे !

By admin | Published: May 25, 2016 02:46 AM2016-05-25T02:46:41+5:302016-05-25T02:46:41+5:30

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांत कोणत्याही पक्षासोबत युती करणार नसल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव

Now let's sing 'Rasp' alone! | आता ‘रासप’चे एकला चलो रे !

आता ‘रासप’चे एकला चलो रे !

Next

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांत कोणत्याही पक्षासोबत युती करणार नसल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जानकर बोलत होते. अहिल्यादेवी होळकर यांच्या २९१ व्या जयंतीनिमित्त आझाद मैदानात आयोजित केलेल्या महोत्सवापासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंगही फुंकणार असल्याची घोषणा त्यांनी या वेळी केली.
युतीचे सरकार असले, तरी रासप सत्तेत नसल्याचे म्हणत जानकर यांनी आपली खंत व्यक्त केली. भाजपावर पूर्ण विश्वास असून मंत्रिपदासाठी भीक मागणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, पक्षाचे जास्त आमदार नसल्याने मंत्रिपदासाठी सरकारवर दबाव टाकता येत नाही आहे. त्यामुळे लायकी वाढवूनच सरकारवर नियंत्रण ठेवू. सर्वच मित्रपक्षांनी दावा करताना चिंतन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
मुंबई मनपा निवडणुकीत स्वबळावर लढत असल्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. ते म्हणाले की, दरवेळी अहिल्याबाई होळकर यांची जयंती चोंडी येथे करत होतो. मात्र आगामी निवडणुकांसाठी यंदा हा कार्यक्रम आझाद मैदानात घेत आहे. या वेळी सुमारे लाखो कार्यकर्ते येण्याचा दावाही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी, रिपाइंचे अध्यक्ष व खासदार रामदास आठवले आणि रासपचे आमदार व नेते यांचीही प्रमुख उपस्थिती असेल. (प्रतिनिधी)

Web Title: Now let's sing 'Rasp' alone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.