वाहतुकीच्या नियमभंगावर आता CCTVची नजर
By admin | Published: October 4, 2016 02:09 PM2016-10-04T14:09:28+5:302016-10-04T14:09:28+5:30
वाहतुकीचे नियम मोडून पळ काढणा-यांवर कारवाई करण्यासाठी आता सीसीटीव्हीच्या तिस-या डोळ्याची मदत होणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - वाहतुकीचे नियम मोडून पळ काढणा-यांवर कारवाई करण्यासाठी आता सीसीटीव्हीच्या तिस-या डोळ्याची मदत होणार आहे. जी व्यक्ती वाहतूकीचे नियम मोडेल, त्याच्या वाहनाची नंबरप्लेट सीसीटीव्हीमध्ये कैद होणार असून तत्काळ दंडाचे चलन बनवण्यात येणार आहे. आणि त्यासंबंधीचा मेसेज संपूर्ण माहितीसह वाहनचालक वा त्या गाडीच्या मालकास मोबाईलवर पाठवण्यात येईल. मेसेज मिळाल्यानंतर वाहन चालक / मालकाला नजीकच्या कॅश पॉईंट असलेल्या पोलीस चौकीत जाऊन दंडाची रक्कम भरता येईल. या नव्या प्रणालीमुळे दंड वसूल करण्याच्या कामात पारदर्शकपणा येईल.