आता बुकिजची पावसावरही नजर, प्रथमच लावणार गोव्यातील मान्सूनवर सट्टा
By admin | Published: June 23, 2016 02:22 PM2016-06-23T14:22:28+5:302016-06-23T16:58:01+5:30
मागच्यावर्षी मुंबईत झालेल्या अपु-या पावसामुळे पावसावर सट्टा खेळणा-या पंटर्सना नुकसान सहन करावे लागले होते.
Next
डिप्पी वांकाणी
मुंबई, दि. २३ - मागच्यावर्षी मुंबईत झालेल्या अपु-या पावसामुळे पावसावर सट्टा खेळणा-या पंटर्सना नुकसान सहन करावे लागले होते. मात्र असे असतानाही यावर्षीही ते पावसाबद्दल आशावादी असून असून त्यानी मुंबईसह गोव्यातील मान्सूनवर सट्टा लावला आहे. यावेळी पंटर्स पहिल्यांदाच गोव्यातील पावसावर सट्टा लावत असून ही रक्कम दहा हजार कोटीच्या पुढे जाईल असा अंदाज एका पंटरने व्यक्त केला आहे. मान्सूनवर सट्टा पारदर्शक असून त्यात फिक्सिंग करता येत नाही असे पंटर्स सांगतात. मागच्यावर्षी पंटर्सना मान्सूनच्या पावसावर सट्टयामध्ये अडीज ते तीन हजार कोटींचे नुकसान झाले होते. पंटर्स मुंबईतील एका महिन्याच्या पावसावर तर गोव्यामध्ये एकूण पावसावर सट्टा लावणार आहेत.
पंटर्स मुंबईत कुलाबा वेधशाळेची तर, गोव्यात पणजी वेधशाळेची आकडेवारी विचारात घेणार आहेत. यावर्षी चांगला पाऊस होईल या भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाच्या आधारवर पंटर्सनी सट्टा खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्यावर्षी एल-निनोच्या घटकामुळे पुरेसा पाऊस झाला नव्हता. यावेळी मागची भरपाई भरुन निघेल असे आम्हाला वाटते असे पंटर्सनी सांगितले.
महिन्यानुसार पंटर्सनी ठरवलेले मुंबईतील दर
महिना पाऊस (एमएम) दर
जून ३०० ३२ पैसे
४०० १रुपया
५०० ३ रुपये
६०० ५ रुपये
जुलै ४०० २२ पैसे
५०० ६५ पैसे
६०० १.३५ पैसे
७०० ३ रुपये
ऑगस्ट ४०० २४ पैसे
५०० ६६ पैसे
६०० १.४० पैसे
७०० ३.२५ पैसे
सप्टेंबर २०० ७० पैसे
३०० ४ रुपये
४०० ८ रुपये
मुंबईतील एकूण मोसमावर दर
पाऊस दर
१७०० ४२ पैसे
१८०० १.०५ रुपये
१९०० १.९० रुपये
२००० २.५० रुपये
२१०० ३.५० रुपये