.. आता मोबाईल फोनवर इंटरनेटशिवाय टीव्ही!
By admin | Published: December 9, 2014 11:58 PM2014-12-09T23:58:41+5:302014-12-09T23:59:02+5:30
दूरदर्शनतर्फे २0 चॅनल्सचे मोफत प्रसारण.
अकोला: मोबाईल फोनवर इंटरनेटशिवाय २0 चॅनल्सचे मोफत प्रसारण करण्याची योजना दूरदर्शनने आखली आहे. त्यानुसार साधारणत: वर्षभरात स्मार्टफोन वापरणार्या ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
विदेशातील एका सरकारी मीडिया कंपनीच्या सहकार्याने प्रसार भारतीतर्फे ही योजना राबविण्यात येत आहे. मानवी जीवनास अन्न, वस्त्र व निवारा या तीन मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे. अलीकडच्या काळात जागतिक पातळीवर ज्ञान, आरोग्य व मनोरंजन या तीन गोष्टींची मानवी मूलभूत सुविधांमध्ये भर टाकण्यात आली आहे. जागतिक पातळीवर मनोरंजनाला महत्त्व देण्यात आले असून, त्यामुळेच मनोरंजन कक्षेचा विस्तार झाला आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे कल्पनाविलास मूर्त स्वरूपात येत असून, दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झालेल्या मोबाईल फोनद्वारे मनोरंजनाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल आता दूरदर्शनच्या माध्यमातून होत आहेत.
टेलिव्हिजन तंत्रज्ञानात सध्या डिश, केबल व अनॉलॉग एन्टेना हे तीन पर्याय उपलब्ध आहेत. यात आता डिजिटल एन्टेनाची भर पडत आहे. पुढील वर्षात मोबाईल फोनसाठी दूरदर्शनतर्फे डिजिटल एन्टेनाद्वारे तब्बल २0 चॅनल्सचे प्रसारण केले जाणार आहे. सुरुवातीला मुंबई व दिल्ली येथे ही सेवा सुरू होत असून, त्यानंतर संपूर्ण भारतात तिचा विस्तार केला जाणार आहे.
*डीव्हीबी-टी २
दूरदर्शनतर्फे वापरण्यात येणार्या तंत्रज्ञानाचे नाव डिजिटल व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग टेरेस्ट्रियल लाईट असे आहे. डीव्हीबीचे सिग्नल्स दूरदर्शन केंद्राच्या टीव्ही टॉवरवरून प्रसारित करण्यात येतील. मोबाईल फोनवर टीव्ही पाहण्यास मोबाईल इंटरनेटची गरज राहणार नाही. डीव्हीबी प्रसारणाची सुविधा मोबाईल फोनवर घेण्यासाठी केवळ एका अँपची आवश्यकता असून, तेच अँप मोबाईल फोनवर टेलिव्हिजन प्रसारणाची सुविधा देण्याचे काम करणार आहे.
*जगातील ४४ देशांमध्ये डीव्हीबी
सद्यस्थितीत जगातील ४४ देश डीव्हीबी-टी तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. भारतात या वर्षाअखेर स्मार्टफोन वापरणार्यांचा आकडा २२.५ कोटीवर जाण्याची शक्यता मोबाईल फोन उत्पादन कंपन्यांतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. या स्मार्टफोनवर इंटरनेटशिवाय टीव्ही पाहणे शक्य होणार आहे.
*र्जमनीच्या कंपनीशी करार
डीव्हीबी-टी तंत्रज्ञानासाठी प्रसार भारतीने र्जमनीची शासकीय कंपनी डायचे वेलेसोबत करार केला आहे. डीव्हीबी-टी तंत्रज्ञानात ज्या बॅन्डविडथ्चा उपयोग करण्यात येणार आहे, त्याचाच उपयोग २0 एफएम रेडिओ चॅनल्स व इतर काही दूरसंचार सेवांसाठी करण्यात येणार आहे.