"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 05:10 PM2024-10-05T17:10:03+5:302024-10-05T17:11:39+5:30

Sambhaji Raje Chhatrapati: विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या संभाजीराजे छत्रपतींनी आता भाजपाला घेरले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर संभाजीराजेंनी यामागे भाजपा असल्याचा आरोप केला आहे. 

"Now Mughal rule is starting from BJP too", Sambhaji Raje Chhatrapati raged after the police action | "आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले

"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले

Sambhaji Raje Chhatrapati on BJP: "आम्हाला किती रोखण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही तिथे जाणार. आम्ही आमचा अधिकार म्हणून तिथे जाणार आहोत. आज पर्यावरण तसेच इतर कारणांमुळे स्मारकाचे काम होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मग, याचा आधी विचार का केला नाही. पंतप्रधानांनी जलपूजन फक्त निवडणूक होती म्हणून केलं होतं का?", असा सवाल करत संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपावर हल्ला बोल केला. 

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा भाजपाने केली होती. या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले होते. या मुद्द्यावरून आता संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, ज्या ठिकाणी स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे, तिथे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मात्र, आता पोलिसांकडून आडकाठी आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला हे. 

पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "2016 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जलपूजन जाले. त्याचा भाजपाकडून मोठा गाजावाजा करण्यात आला. कोट्यवधी रुपये खर्च केले, स्मारकाचे काम कुठंपर्यंत आले आहे, ते पाहण्यासाठी आम्ही जाणार आहोत."

पोस्टर काढले, प्रिंटिंग करणाऱ्याला धमकावले; संभाजीराजेंचे आरोप

"आम्ही मुंबईत पोस्टर लावले होते. ते काढण्यात आले, फाडण्यात आले. ज्या व्यावसायिकाने हे पोस्टर प्रिंट केले, त्यालाही धमकावण्यात आले. आम्ही ज्या बोटी बुक केल्या आहेत, त्यांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ही राज्य सरकारची दडपशाहीच नाही, तर मोघलशाही आहे. भाजपाकडून ह केले जात आहे", असा आरोप संभाजीराजेंनी केला. 

"आमचे पोस्टर लावत असलेल्या कामगारांना खेरवाडीच्या गुरव नावाच्या पोलीस निरीक्षकाने पोलीस ठाण्यात मारहाण केली. स्वतःची चूक झाकायची आणि आम्हाला तिथे जाऊ द्यायचं नाही, असा भाजपाचा प्रयत्न आहे", असे संभाजीराजे म्हणाले. 

"इतिहासामध्ये मोघलशाही होती, पण आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू आहे. आम्ही नियमात सगळे काही करत आहोत. आम्ही कायदेशीर मार्गाने जाणार आहोत. आम्हाला अडवले तर त्याला पूर्णपणे ते जबाबदार असतील. १०० बोटी बुक केल्या होत्या, ५० बोटी घेऊन जाणार आहोत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही आम्ही आवाज उठवला होता", असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

Web Title: "Now Mughal rule is starting from BJP too", Sambhaji Raje Chhatrapati raged after the police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.