पेव्हर ब्लॉकऐवजी आता मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञान

By Admin | Published: March 12, 2015 05:13 AM2015-03-12T05:13:35+5:302015-03-12T05:13:35+5:30

मुंबई महापालिका विविध प्रयोगांसाठी ओळखली जाते. पालिकेचे हे प्रयोग सुरुच असून पेव्हर ब्लॉक ऐवजी आता मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा प्रयोग सुरु केला आहे़

Now the muscular asphalt technology instead of the peaver block | पेव्हर ब्लॉकऐवजी आता मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञान

पेव्हर ब्लॉकऐवजी आता मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञान

googlenewsNext

मुंबई: मुंबई महापालिका विविध प्रयोगांसाठी ओळखली जाते. पालिकेचे हे प्रयोग सुरुच असून पेव्हर ब्लॉक ऐवजी आता मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा प्रयोग सुरु केला आहे़ त्यानुसार वांद्रे आणि जुहूला जोडणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेले पेव्हर ब्लॉक काढण्यात येत आहेत.
रस्त्यांवर होणाऱ्या अनेक प्रयोगांपैकी पेव्हर ब्लॉक एक होता़ मात्र पेव्हर ब्लॉक उखडत असल्यामुळे अखेर हा नाद सोडून पालिकेने ५० छोट्या व दहा मोठ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरु केले आहे़ त्यानुसार नुतनीकरण करण्यात येत असलेल्या या जोड रस्त्यांचे काम यापूर्वी एमएमआरडीने २००७ मध्ये केले होते़ त्यानंतर हे रस्ते पालिकेच्या ताब्यात देण्यात आले़ त्यावेळीस एमएमआरडीएनेच पेव्हर ब्लॉक लावण्याचा बचाव पालिकेकडून सुरु आहे़ या रस्त्यांची हमी कालावधी २०१२ मध्येच संपुष्टात आली आहे़ २००७ ते २०१४ या कालावधीत वारंवार चर खोदल्यामुळे या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे़ त्यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजुचे कडे, पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनि:स्सारण वाहिन्यांचीही
दुरुस्ती करण्यात येणार आहे़ या कामासाठी २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Now the muscular asphalt technology instead of the peaver block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.