आता ‘म्युझियम आॅन व्हील्स’ महापालिका शाळांच्या दारी

By admin | Published: April 8, 2017 03:08 AM2017-04-08T03:08:07+5:302017-04-08T03:08:07+5:30

शिलालेख कसा असतो... आता आपले शहर नष्ट झाले की काय होईल, त्यानंतर उत्खनन प्रक्रियेत काय सापडेल.

Now museum and vehicles' municipal schools | आता ‘म्युझियम आॅन व्हील्स’ महापालिका शाळांच्या दारी

आता ‘म्युझियम आॅन व्हील्स’ महापालिका शाळांच्या दारी

Next

मुंबई : शिलालेख कसा असतो... आता आपले शहर नष्ट झाले की काय होईल, त्यानंतर उत्खनन प्रक्रियेत काय सापडेल... दगडी नाणी कशी बनविली जायची, हा इतिहास रंजक माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न ‘म्युझियम आॅन व्हील्स’च्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे. त्यामुळे कंटाळवाणा विषय म्हणून इतिहासाकडे पाहाणारी लहानगी मंडळी, आता औत्सुक्याने नक्कीच आवडीने इतिहासाचे पुस्तक वाचतील. इतिहास विषयात रुची निर्माण होण्यासाठी भारतीय संस्कृतीचे ज्ञान मुलांना होण्याकरिता, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय म्युझियम आॅन व्हील्स उपक्रम सुरू केला आहे.
इतिहासाचे रंजक रूप शालेय विद्यार्थ्यांना अनुभवता येईल. हा उपक्रम आता मुंबईतील महापालिका शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. यंदाच्या म्युझियम आॅन व्हील्सची संकल्पना ‘अ‍ॅज इट हॅपंड : हिस्टोरिकल सोर्सेस अँड हाउ टू रीड देम’ या भारतीय इतिहासावरील प्रदर्शन आहे. महापालिकेच्या सुमारे हजार शाळांपर्यंत हे प्रदर्शन नेण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रदर्शनात पुरातन शिल्पे, ऐतिहासिक शिलालेख, नाणी, मौखिक परंपरा, महाश्मयुगातील दफनविधी, मातीच्या वस्तू, अश्मयुगीन गृहचित्रे, दगडी अवजारे आदी वस्तू त्यांच्या माहितीसहित प्रदर्शित केल्या आहेत.
वर्गामध्ये इतिहास शिकवतात, त्या वस्तू नेमकी कोणत्या आहेत ते कळत नाही, पण म्युझियम आॅन व्हील्समुळे इतिहासातील काही वस्तू प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळते, त्यामुळे अभ्यास करणे सोपे होईल, असे कुलाबा महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
याविषयी संग्रहालयाच्या शैक्षणिक अधिकारी बिल्वा कुलकर्णी म्हणाल्या की, ‘देशाची कथा, परंपरा आणि पद्धती याचा पाया हा इतिहास आहे. या गोष्टी वर्तमान आणि भविष्याला आकार देत असतात. त्यामुळे आपल्या समृद्ध परंपरेविषयी जागृती निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. म्युझियम आॅन व्हील्सच्या प्रत्येक प्रवासात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आम्हाला आनंद वाटतो आणि नवे प्रदर्शन आपला भूतकाळ पुन्हा जिवंत करेल, तसेच आपल्या भविष्याला अधिक सर्जनशीलता आणि साहसाने माहिती देईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)म्युझियम आॅन व्हील्सची वैशिष्ट्ये
हस्तलिखिते
मातीकामातून साकारलेली शिल्पे
अशोकन आज्ञापत्राची प्रत
परळ येथील ५व्या दशकातील शिवशिल्प

Web Title: Now museum and vehicles' municipal schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.