राज्यभरात आता ‘एकच हेल्पलाइन’!

By admin | Published: December 7, 2014 01:09 AM2014-12-07T01:09:41+5:302014-12-07T01:09:41+5:30

हेल्पलाईन नंबरलक्षात ठेवणो ही सर्वसामान्यांना शक्य नसत़े अनेकवेळा संकटकाळात हेल्पलाईन नंबर आठवत नसल्याचे अनेक घटनांवरुन उघडकीस आले आह़े

Now the only helpline in the state! | राज्यभरात आता ‘एकच हेल्पलाइन’!

राज्यभरात आता ‘एकच हेल्पलाइन’!

Next
अकोला : आपत्कालीन प्रसंगात मदती मिळण्यासाठी हेल्पलाईनची मोठी मदत होत असत़े परंतु विभागनिहाय वेगवेगळे हेल्पलाईन नंबरलक्षात ठेवणो ही सर्वसामान्यांना शक्य नसत़े अनेकवेळा संकटकाळात हेल्पलाईन नंबर आठवत नसल्याचे अनेक घटनांवरुन उघडकीस आले आह़े यावर राज्य शासनाने तोडगा काढत अमेरिकेतील हेल्पलाईन नंबरच्या धर्तीवर सर्व विभागांसाठी एकच हेल्पलाईन नंबर देण्याचा गांभीर्याने विचार करीत आह़े सर्व हेल्पलाईन नंबर गोठवून एकच लक्षात राहील, असा कॉमन हेल्पलाईन नंबर लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे सूत्रंनी सांगितल़े   
एखाद्या आप्तकालीन प्रसंग उद्भवल्यास संबधित यंत्रणोकडून त्वरित मदत मिळावी यासाठी विविध हेल्पलाईन क्रमांक आपल्याकडे अस्तित्वात आहेत. संकट काळात वेगवेगळ्या हेल्पलाईन क्रमांकाची आठवण होणो कठीण असते. आणि त्यामुळे आपत्कालीन संकट दूर होणो अनेकवेळा शक्य होत नाही. हे लक्षात घेवून ज्याप्रमाणो अमेरिकेत 911 हा एकच आपत्कालीन क्रमांक आहे. त्याप्रमाणो राज्यातदेखील एकच आपत्कालीन क्रमांक अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न राज्य शासनाने सुरु केला आहे. 
सध्या अस्तित्वात असलेल्या डझनभर हेल्पलाईन क्रमांकांचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे. यासाठी राज्य पोलीस प्रशासनामार्फत विचारविनिमय सुरु आहे. 
राज्यातील कुठल्याही भागातून दूरध्वनी व मोबाईल फोनद्वारे या हेल्पलाईनवर संपर्क साधता येणार आहे. 
या क्रमांकावर नैसर्गिक आपत्ती तसेच इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदत मागता येणार आहे. नवीन हेल्पलाईन क्रमांक अस्तित्वात आल्यानंतर सध्या दर सहा महिन्यांनी एका विशिष्ट कारणासाठी नवीन हेल्पलाईन क्रमांक अस्तित्वात आणण्याची पद्धती बाद होवून जाईल. (प्रतिनिधी)

 

Web Title: Now the only helpline in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.