आता वाघच म्हणताहेत...वाचवा हो वाचवा...!; वाघांचा मृत्यू होण्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 08:38 AM2023-03-01T08:38:26+5:302023-03-01T08:38:49+5:30

वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी असल्याचे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीसमोर आले आहे

Now only tigers are saying...save yes save...!; Maharashtra ranks second in the country in terms of tiger deaths | आता वाघच म्हणताहेत...वाचवा हो वाचवा...!; वाघांचा मृत्यू होण्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी

आता वाघच म्हणताहेत...वाचवा हो वाचवा...!; वाघांचा मृत्यू होण्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतात दरवर्षी शेकडो वाघांचा मृत्यू झाला असून, २०२३च्या सुरुवातीच्या केवळ दोन महिन्यांमध्येच देशात ३४ वाघांचा मृत्यू झाला आहे. देशात वाघांचा सर्वाधिक मृत्यू मध्य प्रदेशमध्ये होत असून, यानंतर वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी असल्याचे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीसमोर आले आहे; मात्र वाघांचे मृत्यू हे फार आश्चर्यकारक नसून, जानेवारी, फेब्रुवारीत मृत्यूत वाढ होत असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मृत्यू कुठे?
कान्हा, पन्ना, रणथंबोर, पेंच, कॉर्बेट, सातपुडा, ओरंग, काझीरंगा आणि सत्यमंगलम अभयारण्यातून गेल्या दोन महिन्यात ३४ वाघांचा मृत्यू झाला आहे. 

मृत्यू नेमका कशामुळे?
nनैसर्गिक मृत्यू nविजेचा करंट लागणे
nविषबाधा होणे nवाघ अडकणे 
nवाघांमधील लढाई

जगात सर्वाधिक वाघ कुठे?
भारत    २,९६७
रशिया     ४३३ 
इंडोनेशिया    ३७१ 
नेपाळ    ३५५ 
थायलंड    १४९ 
मलेशिया    १२० 
बांगलादेश    १०६ 
भुतान    १०३ 
चीन    ५५ 
म्यानमार    २२ 

Web Title: Now only tigers are saying...save yes save...!; Maharashtra ranks second in the country in terms of tiger deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ