आता लोकाभिमुख आरोग्य सेवा मिशन

By admin | Published: March 18, 2015 01:17 AM2015-03-18T01:17:18+5:302015-03-18T01:17:18+5:30

आरोग्य विभाग लोकाभिमुख करण्यासाठी शासनाचा कार्यक्षेत्रनिहाय नोडल ऑफिसर नियुक्त करण्याचा निर्णय.

Now People's Health Service Mission | आता लोकाभिमुख आरोग्य सेवा मिशन

आता लोकाभिमुख आरोग्य सेवा मिशन

Next

वाशिम : राज्यात प्रभावी, गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याबरोबरच आरोग्य विभाग लोकाभिमुख करण्यासाठी शासनाने १६ मार्च रोजी कार्यक्षेत्रनिहाय नोडल ऑफिसर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य सेवेतील सर्वच स्तरांवर कार्यक्षमता वाढविणे, स्वच्छ व सुसज्ज आरोग्य संस्था तसेच गतिमान प्रशासनासाठी कायापालट योजनेंतर्गत राज्यात कार्यक्षेत्रनिहाय नोडल ऑफिसरची नियुक्ती आणि कर्तव्य याबाबत शासनस्तरावर विचारमंथन झाले आणि १६ मार्च रोजी नोडल ऑफिसरची नियुक्ती व जबाबदार्‍या निश्‍चित करण्यात आल्या. राज्यस्तरावर सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूरच्या प्राचार्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. अमरावती, ठाणे, पुणे, लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, नागपूर मंडळाची जबाबदारी त्या-त्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांवर सोपविली आहे. प्रत्येक जिल्हा प्रशिक्षण पथकाचे वैद्यकीय अधिकारी यांना संबंधित जिलतील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांचे नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. *नोडल ऑफिसरची जबाबदारी रुग्णालय प्रशिक्षण पथकाने दरमहा किमान दहा संस्थांना, जिल्हा प्रशिक्षण पथकाने दरमहा किमान पाच संस्थांना, आरोग्य संस्था व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रांच्या प्राचार्यांनी दरमहा किमान एक आरोग्य संस्थेस भेट देणे, सोयी-सुविधांबाबत पाहणी करणे आणि वस्तुनिष्ठ अहवाल आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे तातडीने सादर करणे, आदी जबाबदार्‍या आरोग्य विभागाने नोडल ऑफिसरवर सोपविल्या आहेत.

Web Title: Now People's Health Service Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.