आता तटकरे एसीबीच्या रडारवर

By admin | Published: June 17, 2015 03:11 AM2015-06-17T03:11:52+5:302015-06-17T03:11:52+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची कोट्यवधींची संपत्ती उघडकीस आणणारा लाचलुचपत प्रतिबंधक

Now on the radar ACB radar | आता तटकरे एसीबीच्या रडारवर

आता तटकरे एसीबीच्या रडारवर

Next


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची कोट्यवधींची संपत्ती उघडकीस आणणारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आता माजी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय सुनील तटकरे यांच्याविरोधातील तपास येत्या तीन महिन्यांत पूर्ण करणार आहे. तशी हमी या विभागाने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.
हा तपास सुरू असल्याचे पत्र या विभागाने न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठासमोर सादर केले. हा तपास येत्या तीन महिन्यांत पूर्ण केला जाईल, असेही या विभागाने स्पष्ट केले. तटकरे यांच्यावर शेतकऱ्यांचा भूखंड लाटल्याचा व महसूल बुडवल्याचा आरोप आहे. त्यामुळे भुजबळ यांच्यानंतर तटकरे यांच्यावरील आरोपांत तथ्य आढळते की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या प्रकरणी भाजपाचे किरीट सोमैया यांनी फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे़ तटकरे यांनी स्वत:च्या व कुटुंबीयांच्या नावे ५१ कंपन्या काढून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या़ याने शासनाचा महसूल बुडाला आहे़ त्यामुळे याची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी सोमैया यांनी याचिकेत केली आहे़ ही याचिका २०१२ मध्ये दाखल झाली. त्यानंतर गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आर्थिक गुन्हे प्रतिबंधक विभाग व रायगड जिल्हाधिकारी यांनी तटकरे यांच्यावरील आरोपींच्या चौकशीचा अंतरिम अहवाल न्यायालयात सादर केला. त्यानंतर एसीबीने या प्रकरणी तीन महिन्यांत तपास पूर्ण करण्याची हमी न्यायालयात दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Now on the radar ACB radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.