आता सेवानवृत्त शासकीय कर्मचार्यांनाही विमा छत्र!
By admin | Published: August 10, 2014 06:22 PM2014-08-10T18:22:30+5:302014-08-10T20:56:07+5:30
१ जुलै २0१४ नंतरच्या निंवृत्तीधारकांना मिळणार लाभ
वाशिम: शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचार्यांना त्यांच्या सेवानवृत्तीनंतरही वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची सोय उपलब्ध करण्यासाठी, राज्य शासनाने वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा छत्र योजना आणली आहे. या योजनेंतर्गत कोणत्याही वैद्यकीय चाचणीविना अस्तित्वात असलेल्या आजारपणापासूनही संरक्षण अनुट्ठोय केले आहे.
शासकीय कर्मचार्यांना वैद्यकीय खर्चाच्या परिपूर्तीची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे बहूतांश कर्मचारी वैद्यकीय विमा घेण्यासाठी इच्छूक नसतात. परिणामी सेवानवृत्तीनंतर नवृती वेतनाच्या र्मयादित स्त्रोतामधून आजारपणांवरील उपचाराचा वाढता खर्च भागविणे कर्मचार्यांना शक्य होत नाही. विमा कंपन्याही नव्याने वैद्यकीय विमा छत्र देत नाहीत. विमा छत्र दिले तरी त्यासाठी वैद्यकीय चाचणी आवश्यक असते आणि आधीपासून असलेल्या आजारांना विमा संरक्षणही मिळत नाही. या सर्व बाबींचा विचार करुन, शासनाने अधिकारी व कर्मचार्यांच्या संघटना आणि विमा कंपन्यांदरम्यान वाटाघाटी घडवून आणल्या. त्यामध्ये विमा कंपन्यांनी संयुक्तरित्या गट वैद्यकीय विम्याचा प्रस्ताव समोर ठेवला. या प्रस्तावानुसार सेवानवृत्त कर्मचार्यांना वैद्यकीय चाचणीची गरज राहणार नसून, कर्मचार्यांना विमा घेतेवेळी अस्तित्वात असलेल्या आजारांसाठीही विमा छत्र मिळणार आहे. ही गटविमाछत्र योजना १ जूलै २0१४ ते ३0 जून २0१५ दरम्यान सेवानवृत्त होणार्या सर्व गट अ, ब, व क दर्जाच्या अधिकारी कर्मचार्यांसाठी सक्तीची राहणार आहे. ही गट विमा पॉलीसी एक वर्षासाठी म्हणजेच १ जूलै २0१४ ते ३0 जून २0१५ पर्यंत राहणार असून, तीन वर्षापर्यंत तिचे आपोआपच नुतनीकरण केले जाणार आहे. त्यामुळे पुढील प्रत्येक वर्षी १ जूलै ते ३0 जूनदरम्यान सेवानवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी आपोआपच या योजनेत सहभागी करुन घेतले जाणार आहेत. ३0 जून २0११ नंतर सेवानवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी या योजनेत आवश्यक तो वार्षिक हप्ता भरुन स्वेच्छेने सहभागी होऊ शकतील. ही योजना ह्यथर्ड पार्टी अँडमिनिस्ट्रेटरह्ण (टीपीए)मार्फत राबविण्यात येणार असून, राज्यातील १,२00 हून अधिक टीपीए अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयात, कॅशलेस पध्दतीने उपचार घेण्याची सोय या योजनेत राहणार आहे.
या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संबंधीत कर्मचार्याला आगाऊ रक्कम भरावी लागणार नसून, रुग्णालयातील उपचाराचा खर्च अनुज्ञयतेप्रमाणे कॅशलेस पध्दतीने विमा कंपनीकडून थेट रुग्णालयास प्रदान केला जाणार आहे. यासोबतच अत्यंत तातडीच्या वेळी कोणत्याही रुग्णालयात उपचार करुन घेण्यासह त्या खर्चाची प्रतीपूर्ती अटीनुसार विमा कंपन्यांकडून केली जाण्याची सोयही विमाछत्र योजनेतून शासनाने सेवानवृत्त कर्मचार्यांना उपलब्ध करुन दिली आहे.