"...तोपर्यंत संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड जेल राहणार;" किरीट सोमय्यांनी केलं मोठं भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 08:23 PM2022-08-08T20:23:56+5:302022-08-08T20:24:46+5:30
यापूर्वी न्यायालयाने संजय राऊतांना ईडीची कोठडी सुनावली होती. ती आज संपली. यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, यावेळी ईडीने राऊतांच्या चौकशीसाठी ईडी कोठडी मागितली नाही.
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना आज सेशन कोर्टाने 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे आता त्यांचा पुढील मुक्काम हा मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात असणार आहे. येथेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुखही आहेत. यावरून आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, आता संजय राऊतांचा मुक्काम नवाब मलीक यांचे शेजारी बनून आर्थर रोड जेलमध्ये राहणार, असे म्हणत मोठे भाकित केले आहे.
"आता संजय राऊतांचा मुक्काम नवाब मलीक यांचे शेजारी बनून आर्थर रोड जेलमध्ये राहणार. सध्या तर पत्रा चाळ घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. वसई 2000 कोटींचा पर्ल ग्रुप घोटाळा, दुबईमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये बिल्डर्स मंडळींसोबत बैठका, चीन दौरा... घोटाळ्यांची चौकशी होईपर्यंत संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड जेल रहणार, असे मला वाटते," असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
अब संजय राऊत का मुक्काम नवाब मलिकके पडोसी बनकर आर्थर रोड जेल मै होगा।
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 8, 2022
अभी तो पत्रा चाल घोटाले की जाच हो रही है. वसई 2000 करोड पर्ल ग्रुप घोटाला, दुबई मै फाईव स्टार हॉटेल्स मै बिल्डर्स के साथ मिटींग्स, चीन यात्रा... घोटालों की जाच होने तक संजय राऊत का मुक्काम आर्थर रोड जेल रहेगा pic.twitter.com/cG72SE6tJW
यापूर्वी न्यायालयाने संजय राऊतांना ईडीची कोठडी सुनावली होती. ती आज संपली. यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, यावेळी ईडीने राऊतांच्या चौकशीसाठी ईडी कोठडी मागितली नाही. यामुळे कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.