आता बीकेसी ग्राऊंडवरुन शिवसेना-भाजपा आमनेसामने
By admin | Published: February 11, 2017 08:01 PM2017-02-11T20:01:26+5:302017-02-11T20:29:48+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीची शेवटची प्रचार सभा 18 फेब्रुवारीला होणार आहे. या पार्श्वभूमीवर बीकेसी ग्राउंडवर शेवटची सभा कोण घेणार यावरून आता शिवसेना-भाजपा आमने-सामने उभे ठाकले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11- मुंबई महापालिका निवडणुकीची शेवटची प्रचार सभा 18 फेब्रुवारीला होणार आहे. या पार्श्वभूमीवर बीकेसी ग्राउंडवर शेवटची सभा कोण घेणार यावरून आता शिवसेना-भाजपा आमने-सामने उभे ठाकले आहेत. बीकेसीमध्ये सभा घेण्यासाठी शिवसेनेला जागा मिळू नये, यासाठी मुख्यमंत्री दबाव टाकत
असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केला आहे. सभेच्या परवानगीसाठी शिवसेनेने MMRDA ला 12 जानेवारी रोजी पत्र दिले. मात्र या ठिकाणी भाजपच्या सभेला परवानगी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दबाव टाकत असल्याचे अनिल परब म्हणाले आहेत.
भाजपाला पराभव दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकरत असल्याचा हल्लाबोलही यावेळी परब यांनी केला. दरम्यान, सभेसाठी शिवसेनेला परवानगी न मिळाल्यास भाजपा विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही अनिल परब यांनी दिला आहे.
तसंच काहीही झाले तरी शिवसेनेची शेवटची सभा बीकेसी ग्राऊंडवरच होणार असंही परब यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे 18 फेब्रुवारीला बीकेसीचं मैदानावर शिवसेनेची सभा होणार की भाजपाची हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.