आता खडसेंवर हत्येचा गुन्हा नोंदवावा का?
By admin | Published: January 17, 2015 03:42 AM2015-01-17T03:42:55+5:302015-01-17T03:42:55+5:30
काँग्रेसची सत्ता असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे शेतकरी आत्महत्यांप्रकरणी शासनावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
जळगाव : काँग्रेसची सत्ता असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे शेतकरी आत्महत्यांप्रकरणी शासनावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत होते. आता ते कृषीमंत्री आहेत, शेतकरी आत्महत्यांप्रकरणी त्यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करायचा का, असा सवाल काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी येथे केला.
युवक काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन २३० दिवस झाले. या काळात ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर राज्यात १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूस कवटाळले.
मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सर्वच मंत्री अस्वस्थ आहेत. प्रत्येक मंत्र्याची कार आणि घराची खासगी सुरक्षा एजन्सीच्या मार्फत तपासणी होत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
काँग्रेसचा कार्यकर्ता प्रामाणिक आहे. तो पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने पक्षाचे काम करतो. मात्र नेत्यांनी त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नच केले नसल्याने काँग्रेसला फटका बसला. कार्यकर्त्याला बळ न मिळाल्याने पक्षाचा पराभव झाल्याचे त्यांनी मान्य केले. (प्रतिनिधी)