आता विभागीय पातळीवर सोशल इंजिनीअरिंग
By admin | Published: June 6, 2014 01:34 AM2014-06-06T01:34:26+5:302014-06-06T11:42:23+5:30
भाजपाच्या छत्रखाली अठरापगड जातींना एकत्र आणून सोशल इंजिनीअरिंग करण्यात ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना यश आले होते.
Next
>भाजपाची नवी रणनीती : विभागनिहाय नेतृत्वामार्फत सामाजिक समरसता दृढ करण्याचा प्रय} करणार
यदु जोशी - मुंबई
भाजपाच्या छत्रखाली अठरापगड जातींना एकत्र आणून सोशल इंजिनीअरिंग करण्यात ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना यश आले होते. आता त्यांच्या निधनानंतर हे काम राज्य पातळीवर पुढे नेऊ शकेल, अशा नेत्याची भाजपाला वानवा भासणार असल्यामुळे विभागीय पातळीवर तिथल्या नेत्यांच्या पुढाकाराने हा वसा पुढे चालविण्याचा प्रय} पक्षातर्फे केला जाणार आहे.
1982मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुण्याजवळील तळजाई येथे झालेल्या शिबिरात तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी सामाजिक अभियांत्रिकीची कल्पना मांडली होती. ‘जातीभेद करणो हे पाप नसेल, तर मग जगात कुठलीही गोष्ट पाप नाही,’ या शब्दांत त्यांनी जातीभेदावर प्रहार केले होते. तेव्हापासून संघ परिवारातील विविध संघटना सोशल इंजिनीअरिंगची संकल्पना राबवू लागल्या. पुढे मुंडेंनी या कल्पनेचा विस्तार केला. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मुंडे यांच्यानंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम भाजपामध्ये एव्हाना सुरू झाले आहे. त्यातूनच सामूहिक नेतृत्वाची कल्पना पुढे आली आहे. आता त्याच्याही पुढे विभागनिहाय नेतृत्वामार्फत राजकारणात सामाजिक समरसता दृढ करण्याचा प्रय} केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत अलीकडे महायुतीला मोठे यश मिळाले.
मुंडे यांच्या पुढाकारातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, रामदास आठवले यांची रिपाइं आणि महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष यांची मोट बांधली गेली. हाच प्रयोग विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवला जाईल, असे पक्षाच्या सूत्रंनी सांगितल़े
शिवसेनेचा राजकीय कित्ता भाजपानेदेखील गिरवावा
शिवसेनेत जातीय राजकारणाला कधीच खतपाणी घातले जात नाही. त्यामुळे या संघटनेत बहुजन समाज मोठय़ा प्रमाणात आला. सेनेने निवडणुकीतील तिकीट वाटपातदेखील जातीभेद केला नाही. शिवसेनेचा हा राजकीय कित्ता भाजपानेदेखील गिरवावा, असा सूर आता पक्षात उमटत आहे.