...आता तरुणींसाठी खास कोल्हापुरी चपला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:49 AM2017-08-01T04:49:21+5:302017-08-01T04:49:29+5:30
मर्दाच्या पायात झोकात शोभून दिसणारी कोल्हापुरी चप्पल आता तरुणींच्या नाजूक पायालाही मोहिनी घालणार आहेत. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे प्रथमच खास तरुणींसाठी
विशाल शिर्के ।
पुणे : मर्दाच्या पायात झोकात शोभून दिसणारी कोल्हापुरी चप्पल आता तरुणींच्या नाजूक पायालाही मोहिनी घालणार आहेत. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे प्रथमच खास तरुणींसाठी नाजूक नजाकतीने बनविलेल्या कोल्हापुरी चप्पल तयार करण्यात येणार असून येत्या तीन महिन्यांत त्या बाजारात उपलब्ध होणार आहेत.
कोल्हापुरी चप्पल राज्यातील ग्रामोद्योगाचा मानबिंदू आहे. मध्यंतरी डेन्मार्कला या चप्पल पाठविण्याचे प्रयत्न झाले. मात्र, चप्पल चावरी असून, कधी शंभर ग्रॅम तर कधी ११० ग्रॅम वजनाची चप्पल पाठविली जाते, असा प्रतिकूल अभिप्राय तेथून आल्याने मंडळातर्फे यावर गांभीर्याने विचार सुरू झाला. त्यातूनच ही कल्पना आकाराला आली. तरुणाईचा कल लक्षात घेऊन नव्या आकर्षक आकाराच्या, नाजूक कलाकुसर असलेल्या लेदरच्या चप्पल बनविल्या जाणार आहेत.
यासाठी कोल्हापुरातील कारागिरांना लेदर उद्योगातील प्रख्यात कंपनीच्या माजी वरिष्ठ अधिकाºयांमार्फत आॅगस्ट ते आॅक्टोबर-२०१७ या कालावधीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. डिझाईन्स, आकार, वजन आणि वेष्टन अशा गोष्टींवरही प्रशिक्षणात भर देण्यात येईल. या पूर्वी देखील कारागिरांसाठी काही कार्यशाळा घेण्यात आाल्या होत्या. जागतिक बाजारपेठेत कोल्हापुरीला स्थान मिळवून देण्याचा मानस असल्याचे, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया यांनी सांगितले.