आता क्रीडा प्रशिक्षकांनाही पुरस्कार
By admin | Published: July 12, 2014 10:23 PM2014-07-12T22:23:47+5:302014-07-12T22:23:47+5:30
ना. वळवी यांची घोषणा
चिखली : क्रीडा व युवकांसंदर्भात आम्ही सातत्याने नवनविन प्रयोग करून प्रोत्साहन देण्याचे काम करीत असतो, क्रीडा विषयक शिक्षण देणारे प्रशिक्षक यांनाही प्रोत्साहीत करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून जागतीक किंवा देश पातळीवर बक्षिस प्राप्त करणारे खेळांडूना जे रोख पुरस्कार दिल्या जातात त्याच्या २५ टक्के रक्कम प्रशिक्षकांना यापुढे देण्यात येणार आहे.
अशी क्रिडा मंत्री ना. पदमाकर वळवी यांनी येथील तालुका क्रीडा संकुलाच्या लोकार्पण प्रसंगी केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राहुल बोंद्रे होते. चिखली येथे निर्माण करण्यात आलेल्या तालुका क्रिडा संकुलाचे लोकार्पण १२ जुलै रोजी गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून करण्यात आले. याप्रसंगी क्रिडा सहसंचालक जयप्रकाश दुबळे, चिखली बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिनदयाल वाधवाणी, प.स.सभापती प्रा.माधुरी देशमुख, राकाँ तालुकाध्यक्ष भगवानराव काळे, शहराध्यक्ष रवि तोडकर, कॉग्रेसचे शहराध्यक्ष प्रदिप पचेरवाल, जिल्हा क्रिडा अधिकारी गणेश जाधव, तहसिलदार तथा तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष राजेश्वर हांडे, तालुका क्रिडा अधिकारी चंद्रकांत उपलवार, ओबीसी सेलचे प्रदेश सचिव सुधाकरराव धमक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना ना.वळवी यांनी राज्य क्रीडा निधीतून क्रीडापटूंना दिल्या जाणार्या मदती संदर्भातील धोरणांची सविस्तर माहिती देतांनाच तालुका स्तरावर किंवा नाविन्यपुर्ण योजनेतून व्यायमशाळा विकासासाठी ७ लक्ष पर्यंत निधी देण्याची तरतुद केली असल्याचे सांगून पुर्वी हा निधी २ लक्ष पर्यंत र्मयादीत दिल्या जात होता, त्यात वाढ केल्याचे नमूद केले. तसेच चिखली तालुका क्रिडा संकुलासाठी आ.राहुल बोंद्रे यांनी २ कोटी रूपये अतिरीक्त निधीची मागणी केली त्यापैकी तातडीने ६0 ते ७0 लक्ष रूपये मंजूर करण्याचे आश्वासन दिले. प्रस्तावीक तालुका क्रिडा अधिकारी चंद्रकांत उपलवार यांनी केले. याप्रसंगी अनुराधा इंग्लीश स्कूलच्या विद्यार्थांनी थरारक कराटे प्रात्यक्षीक व जिल्हा तलवार बाजी संघाच्या खेळाडूंनी तलवार बाजीचे प्रात्यक्षीक सादर केले. तर जिजाऊ मुलींच्या सैनिकी शाळेच्या विद्याथींनी संचलन केले. याप्रसंगी याप्रसंगी तालुक्यातील चिखली तालुक्यातील विविध खेळातील क्रिडापटू आणि विविध क्रिडा संघटनाचे पदाधिकारी, तालुक्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडुंना प्रशिक्षण देणारे त्यांचे प्रशिक्षक यांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तालुका क्रिडा संकुलाचे आर्कीटेक्ट जयंत सोनुने आणि बांधकाम कंत्राटदार राजेश लढ्ढा यांचाही सत्कार करण्यात आला.