आता एसटी पूर्ण आसन क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करणार; मास्क, सॅनिटायजर बंधनकारक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 02:06 AM2020-09-18T02:06:41+5:302020-09-18T06:31:42+5:30

कर्नाटक आणि गुजरात राज्यात १०० टक्के प्रवासी वाहतूक सुरू केल्याच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने करण्यास मंजुरी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Now the ST will transport passengers at full seating capacity; Mask, sanitizer binding | आता एसटी पूर्ण आसन क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करणार; मास्क, सॅनिटायजर बंधनकारक 

आता एसटी पूर्ण आसन क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करणार; मास्क, सॅनिटायजर बंधनकारक 

Next

मुंबई : महाराष्ट्राची लाडकी लाल परी म्हणजेच एसटी आता पूर्ण आसन क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करणार आहे. एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायजर लावणे बंधनकारक आहे.
२० आॅगस्टपासून सामाजिक अंतर राखत आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रमाणे आंतर जिल्हा वाहतूक सुरू करण्यास राज्य परिवहन मंडळास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली. कर्नाटक आणि गुजरात राज्यात १०० टक्के प्रवासी वाहतूक सुरू केल्याच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने करण्यास मंजुरी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाºया बस निर्जंतुक करूनच मार्गस्थ करण्यात येतील. लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बससाठी एका आसनावर एक प्रवासी अशा तिरप्या पद्धतीने आरक्षण उपलब्ध असेल.

5000बस सध्या दिवसभरात धावतात

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळे बंदीच्या काळात गेली पाच महिने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यभर एसटी वाहतूक बंद होती. नंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार, टप्प्याटप्प्याने ती सुरू करण्यात आली.

सद्यस्थितीला दिवसभरात एसटीच्या सुमारे ५ हजार बस राज्यभरात धावातात. सरासरी
5-6 लाख
प्रवाशांची वाहतूक केली जाते. पूर्ण आसन क्षमतेने वाहतूक सुरू झाल्यास, प्रवाशांना दिलासा मिळेल.

Web Title: Now the ST will transport passengers at full seating capacity; Mask, sanitizer binding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.