राज्यात अब की बार महायुतीची सरकार

By admin | Published: August 10, 2014 09:56 AM2014-08-10T09:56:15+5:302014-08-10T12:41:47+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा शिवसेना - भाजपा महायुतीचा विजय होईल असे भाकीत एबीपी न्यू आणि नेल्सनने वर्तवले आहे.

Now the state of Maha Yugavi is now in the state | राज्यात अब की बार महायुतीची सरकार

राज्यात अब की बार महायुतीची सरकार

Next

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १० - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा  शिवसेना - भाजपा महायुतीचा विजय होईल असे भाकीत एबीपी न्यू आणि नेल्सनने वर्तवले आहे. विशेष म्हणजे  महायुती किंवा स्वबळावर लढल्यास राज्यात सर्वाधिक जागा भाजपलाच मिळतील असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
एबीपी न्यूज आणि नेल्सनने जुलै ते ऑगस्ट याकालावधीत सुमारे २२ हजार सॅम्पल गोळा करुन विधानसभेसाठी जनमत जाणून घेतले. यानुसार राज्यातील २८८ जागांपैकी महायुतीला २१० आणि आघाडीला फक्त ५५ जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. महायुतीतील २१० पैकी १२२ जागांवर भाजप, ८२ जागांवर शिवसेना, रिपाई आणि स्वाभिमानी प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर आघाडीत काँग्रेसला ३२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला २३ जागांवर विजय मिळेल असे सर्वेक्षणात म्हटले आहे. मनसेला यंदा ११ जागांवरच समाधान मानावे लागेल असे सांगितले जाते. 
----------
स्वबळावर लढल्यावरही भाजपचे पारडे जड
विधानसभेसाठी शिवसेना- भाजप-रिपाई- स्वाभिमानी यांची महायुती आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती कायम असली तरी स्वबळावर लढल्यास भाजपचेच पारडे जड असल्याने सर्वेक्षणातून समोर येते. भाजपला ११२ जागा, शिवसेनेला ६२ जागा मिळतील असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. तर काँग्रेसला ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ३८ जागांवर विजय मिळेल असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.  मात्र बहुमतासाठी आवश्यक असलेले १४५ चे मॅजिक फिगर गाठण्यात सर्व पक्ष अपयशी ठरतील हे स्पष्ट होते. . 
----------
पृथ्वीराज चव्हाण अव्वल
मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण हे अद्याप एकाही पक्षाने स्पष्ट केलेले नाही. मात्र एबीपी - नील्सनच्या सर्वेक्षणात मतदारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना सर्वाधिक पसंती दिली आहे. चव्हाण यांना २१ टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शवला. तर त्याखालोखाल उद्धव ठाकरे १८ टक्के, देवेंद्र फडणवीस १६ टक्के यांचा क्रमांक लागला आहे. तर राज ठाकरेंना ८ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर आहेत. 

Web Title: Now the state of Maha Yugavi is now in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.