...आता नाणार आंदोलनाचे गुन्हेही मागे घ्या; आरे निर्णयावर मुख्यमंत्र्यांना नितेश राणेंचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 10:33 PM2019-12-01T22:33:54+5:302019-12-01T22:36:07+5:30

आरे आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत ते मागे घ्यावेत. त्यांच्यावर कुठलाही खटला चालविला जाणार नसल्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

... Now take back the crime cases of the Nanar agitation; Nitesh Rane's challenge to uddhav thackrey | ...आता नाणार आंदोलनाचे गुन्हेही मागे घ्या; आरे निर्णयावर मुख्यमंत्र्यांना नितेश राणेंचे आव्हान

...आता नाणार आंदोलनाचे गुन्हेही मागे घ्या; आरे निर्णयावर मुख्यमंत्र्यांना नितेश राणेंचे आव्हान

Next

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या कामाला स्थगिती दिली होती. यानंतर आज आरे जंगलातील वृक्षतोडीविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील नोंदविलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंना आव्हान दिले आहे. 


उद्धव ठाकरेंनी परंपरेनुसार पदभार स्विकारल्यानंतर विधिमंडळ वार्ताहर संघात जाऊन पत्रकारांशी संवाद साधला. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित मुंबईत जन्मलेला,वाढलेला महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री मीच आहे. त्यामुळे मुंबईसाठी आणखी काही वेगळं करता येईल का, याबाबत मी विचारधीन आहे. त्यासोबत महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठीही मी तेवढाच विचार करत असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आता जेवढी झाडं राहिली आहेत, ती तशीच राहतील. या झाडांपैकी एकही झाड पडणार नसून त्या झाडांचं पानही कुणी तोडणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडसाठीच्या जंगलतोडीला स्थगिती दिल्याचं सांगितले होते.


आरे आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत ते मागे घ्यावेत. त्यांच्यावर कुठलाही खटला चालविला जाणार नाही, असे सांगतानाच ठाकरे यांनी येत्या एक दोन दिवसांत मंत्रिमंडऴ विस्तार करणार असल्याचे सांगितले. तसेच मी आणि सहा मंत्री एकत्र बसून निर्णय घेत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. आज विधानसभा अध्यक्षांची निवड होती. आता आम्ही मोकळे झालेलो आहोत. आता पुढील कामे ही जोमाने करू. राज्याची नेमकी परिस्थिती काय आहे त्याचे अवलोकन करत आहोत. मी मेट्रोच्या कामाला स्थगिती दिलेली नाही. विकासाच्या कोणत्याही कामाला मी स्थगिती दिलेली नाही. शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या सर्व केल्याशिवाय मी राहणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.    


यावर नितेश राणे यांनी आरे आंदोलनाचे केसेस मागे घेतलात, आता नाणार आंदोलनाच्या केसेस पण परत घ्या, ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते, असा टोला ठाकरे यांना लगावला आहे. राणे यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर ठाकरे यांच्यावर खरपूस टीका केली होती. मातोश्रीवरून या आधी उत्तरे मिळत नव्हती, आता त्यांना विधानसभेत द्यावी लागतील असा इशारा दिला होता. 

Web Title: ... Now take back the crime cases of the Nanar agitation; Nitesh Rane's challenge to uddhav thackrey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.