आता सतावले वलसाड फास्टने

By admin | Published: April 27, 2016 04:09 AM2016-04-27T04:09:54+5:302016-04-27T04:09:54+5:30

पश्चिम रेल्वेच्या सफाळा स्थानकात गाड्यांचा विलंब दिवसेंदिवस वाढत आहे.

Now Valsad fasten | आता सतावले वलसाड फास्टने

आता सतावले वलसाड फास्टने

Next

डहाणू/सफाळे : पश्चिम रेल्वेच्या सफाळा स्थानकात गाड्यांचा विलंब दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरदारवर्ग, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. या २ दिवसामध्ये मेगाब्लॉक व वलसाड फास्ट पॅसेंजरच्या इंजिनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाड यामुळे नोकरदारवर्गाचे व परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गाड्या वेळेवर न येण्यामुळे नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तसेच २ दिवसांमध्ये झालेल्या अनियमित रेल्वेमुळे प्रवाशांचे व नोकरदार वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. सकाळी वलसाडहून मुंबई सेंट्रलला जाणाऱ्या वलसाड फास्ट पॅसेंजर या गाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती सफाळे रेल्वेस्थानकावर २० मि. रखडल्यामुळे नोकरदार वर्गाला १ दिवसाची रजा टाकावी लागली आहे. (वार्ताहर)

Web Title: Now Valsad fasten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.