दारुबंदीच्या मतपत्रिकेवर आता ‘उभ्या-आडव्या’ बाटलीचे चिन्ह

By Admin | Published: July 27, 2016 04:41 PM2016-07-27T16:41:10+5:302016-07-27T16:41:10+5:30

दारुबंदीसाठीच्या मतदानात आता मतपत्रिकेवर उभ्या-आडव्या बाटलीचे चिन्ह देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Now the 'vertical-horizontal bottle' symbol is now on the ballot papers | दारुबंदीच्या मतपत्रिकेवर आता ‘उभ्या-आडव्या’ बाटलीचे चिन्ह

दारुबंदीच्या मतपत्रिकेवर आता ‘उभ्या-आडव्या’ बाटलीचे चिन्ह

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. २७ : दारुबंदीसाठीच्या मतदानात आता मतपत्रिकेवर उभ्या-आडव्या बाटलीचे चिन्ह देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच हा निर्णय घेण्यात आला.

अण्णांनी दारुबंदीसाठी आंदोलन केल्यानंतर २००२ साली शासनाने काढलेल्या आदेशात दारुबंदीसाठीच्या मतपत्रिकेवर उभ्या-आडव्या बाटलीचे चिन्ह देण्याची तरतूद होती. मात्र, २००८ च्या आदेशात हे चिन्ह वगळण्यात आले. ‘मद्यविक्री अनुज्ञप्ती चालू ठेवावी किंवा बंद करावी’, असा लेखी पर्याय या मतपत्रिकेत असतो. त्यामुळे अशिक्षित महिलांना मतदान करताना अडथळा येतो व दारुविक्रेत्यांचा फायदा होतो, असा अण्णांचा आक्षेप होता.

यासाठी अण्णांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीला उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व या विभागाचे आयुक्त उपस्थित होते. दारुबंदीसाठी ज्या गावात मतदान होईल, तेथे आता मतपत्रिकेवर हे चिन्ह देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. अण्णांच्या पारनेर तालुक्यातील निघोज गावात रविवारी दारुबंदीसाठी मतदान होणार आहे. बावनकुळे यांनी पारनेरच्या तहसीलदारांशी संपर्क साधून त्यांना मतपत्रिकेत चिन्ह समाविष्ट करण्याचा आदेश दिला आहे.

Web Title: Now the 'vertical-horizontal bottle' symbol is now on the ballot papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.