आता प्रतीक्षा निकालाची!

By admin | Published: July 28, 2015 02:32 AM2015-07-28T02:32:26+5:302015-07-28T02:32:26+5:30

याकूब मेमनच्या डेथ वॉरंटसंदर्भातील याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्याअनुषंगाने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीची तयारी आता

Now waiting! | आता प्रतीक्षा निकालाची!

आता प्रतीक्षा निकालाची!

Next

नागपूर : याकूब मेमनच्या डेथ वॉरंटसंदर्भातील याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्याअनुषंगाने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीची तयारी आता अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, सोमवारी सकाळी कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारागृहातील तयारीची पाहणी करून संबंधितांची प्रदीर्घ बैठक घेतली. नेहमीप्रमाणे सोमवारीसुद्धा त्यांनी पत्रकारांना टाळले.
फाशी टाळण्यासाठी याकूबने राज्यपालांकडे दयेचा अर्ज सादर करून सर्वोच्च न्यायालयात डेथ वॉरंट बेकायदेशीर असल्याचा दावा करणारी याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवरील पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. तर दयेच्या अर्जाबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने साऱ्यांच्या नजरा आता मंगळवारकडे लागल्या आहेत.
गुरुदासपूरला झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यापूर्वीच गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या सतर्कतेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीच्या उपाययोजना अधिकच कडक केल्या. कारागृहात जाणारे नागरिक, वकील आणि पत्रकारच नव्हेतर पोलिसांचीही रीतसर तपासणी केली जात होती.

हेलिकॉप्टरने टेहळणी
एक हेलिकॉप्टर आणि छोटे विमान दुपारी आलटून-पालटून वारंवार कारागृहाच्या वरच्या भागात टेहळणी करून कारागृहाच्या आतमधील तसेच बाहेरच्या भागातील स्थितीची पाहणी करीत होते. कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी सोमवारी पुन्हा आतमधील फाशी यार्डसह अनेक बराकींची स्वत: पाहणी केली. ‘तेथील’ तयारी अंतिम टप्प्यात असल्याची खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ बैठक घेतली. सुरक्षेसंदर्भात कुणी लहानशी चूक करीत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. संबंधितावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना बजावून सांगितल्याचे समजते.

Web Title: Now waiting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.