आता यापुढे जे काही असेल ते स्वबळावर- उद्धव ठाकरे
By admin | Published: January 26, 2017 07:08 PM2017-01-26T19:08:45+5:302017-01-26T19:59:44+5:30
शिवसेना स्वबळावर महाराष्ट्रात भगवा फडकावेल, माझ्या मनातलं लोकांनी ओळखलंय म्हणत उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - शिवसेना महाराष्ट्रात स्वबळावर भगवा फडकावेल, माझ्या मनातलं लोकांनी ओळखलंय. शिवसेनेची 50 पैकी 25 वर्षं युतीमध्ये सडली. आता जे काही असेल ते स्वबळावर, आजपासून युतीसाठी कोणाच्याही दारात जाणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. ते गोरेगावच्या एनएसई ग्राऊंडवर शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी मित्र पक्ष असलेल्या भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे. ठाणे, नाशिक, मुंबई महापालिकेसह आता कोणत्याही जिल्हा परिषद निवडणुकीत युती होणार नाही, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युती तोडली आहे.
सत्तेमध्ये नालायक लोक बसलेली आहेत, सरकारी कार्यालयांमधले देव-देवतांचे फोटो काढण्याचा फतवा सहन करणार नाही. सरकारी कर्मचा-यांना पहिली घरे द्या आणि मग वटहुकूम काढा, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. ते म्हणाले, कोण कोणाच्या बाजूने आहेत तेच कळत नाही, काल एक पद्म पुरस्कार गुरुदक्षिणा म्हणून दिला. निधर्मीपणा सर्व बाबतीत आणा. खादीबाबतच्या कॅलेंडरवरून गांधींना का हटवलं ?, हिंमत असेल तर समान नागरी कायदा लागू करा, उधळलेल्या बैलांना वेसण घालण्याची वेळ आली आहे. सरकारच्या बैलांना रोखण्यासाठी शिवसैनिक रस्त्यांवर उतरले पाहिजेत. देव-देवतांचे फोटो काढण्याच्या आदेशापूर्वी सेनेला का विचारलं नाही. आम्हाला देव-देवतांचे फोटो काढण्याच्या अध्यादेशाबाबत अंधारात ठेवता, मग मलाही मंत्रिमंडळातील कारभारात पारदर्शकता हवी आहे. स्थायी समितीत भाजप मूग गिळून गप्प का ?, माझा सैनिक मर्द आहे, आजपासून युतीसाठी कोणाच्या दारात जाणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे