आता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म

By admin | Published: January 18, 2017 06:58 AM2017-01-18T06:58:27+5:302017-01-18T06:58:27+5:30

राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याची सिद्धता करणारे 'नमुना-२ (ब)' हे पत्र आता उमेदवारी अर्जासोबतच दाखल करावे लागणार आहे.

Now you have to apply the 'AB' form along with the application | आता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म

आता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म

Next

गजानन मोहोड,

अमरावती- राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याची सिद्धता करणारे 'नमुना-२ (ब)' हे पत्र आता उमेदवारी अर्जासोबतच दाखल करावे लागणार आहे. पूर्वी छाननीच्या दिवसापर्यंत हे नमुनापत्र सादर करण्याची मुभा उमेदवारांना होती. तथापि, नियमात करण्यात आलेल्या ताज्या बदलानंतर उमेदवारांनी आणि पक्षांची धावपळ वाढणार आहे.
राज्यातील एकूण २५ जिल्हा परिषद व २८३ पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम ११ जानेवारीला जाहीर झाला आहे. विविध राजकीय पक्षांद्वारे अधिकृत उमेदवारांना पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी विहित नमुन्यात पत्र देण्यात येते. त्याला नमुना २ (ब) पत्र असे संबोधतात. हे पत्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या म्हणजेच छाननीच्या तारखेपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत देण्याची मुभा उमेदवारांना होती. ग्रामविकास विभागाने काढलेल्या व शासनाद्वारे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार आता हे पत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या तारखेस दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक झाले आहे. राजकीय पक्षांना उमेदवारी यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना नमुना २ (ब) देण्याची घाई करावी लागणार आहे.
>दोन टप्पे, दोन तारखा
पहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषद व १६५ पंचायत समितींसाठी निवडणुका होतील. त्यासाठी १ फेब्रुवारीला नमुना पत्र सादर करता येईल. दुसऱ्या टप्प्यातील ११ जिल्हा परिषद आणि ११८ पंचायत समितींसाठी ६ फेबु्रवारीला नमुना पत्र देणे अनिवार्य आहे. नमुना पत्र न दिल्यास उमेदवार अपक्ष मानण्यात येईल.
पक्षाच्या पत्रात हा उल्लेख महत्त्वाचा
उमेदवाराने अर्जात तो ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे, त्याचा उल्लेख केला नसेल व त्यास एखाद्या पक्षाचा नमुना २ (ब) प्राप्त झाला, तरी तो पक्षाचा अधिकृत उमेदवार राहणार नाही.
उमेदवाराने अर्जात जरी तो ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत असल्याचा उल्लेख केला, तथापि त्यास पक्षाने नमुना २ (ब) दिला नाही, तर तो पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरणार नाही.

Web Title: Now you have to apply the 'AB' form along with the application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.