आता एक रुपयात मिळेल पीकविमा, पाच प्रकारच्या नुकसानीला कवच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 10:25 AM2023-06-26T10:25:09+5:302023-06-26T10:25:30+5:30
Crop Insurance: राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक रुपया भरून पीक विमा लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. पाच प्रकारच्या नुकसानाला या सर्वसमावेशक पीक विमा योजनेत कवच मिळेल. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.
मुंबई - राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक रुपया भरून पीक विमा लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. पाच प्रकारच्या नुकसानाला या सर्वसमावेशक पीक विमा योजनेत कवच मिळेल. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.
केंद्र सरकारने पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच दोन्हींमधील नगदी पिकांसाठी पाच टक्के असा आहे. राज्य सरकारच्या नवीन पीक विमा योजनेत शेतकरी हिश्श्याचा भारदेखील राज्य सरकार उचलणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य कृषी आयुक्तांची असेल.
खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत ते दिले जाईल. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना एक रुपयात पीक विमा योजना लागू करण्याची घोषणा केली होती. कृषी काढलेल्या आदेशामुळे त्या घोषणेची अंमलबजावणी झाली आहे.
योजना कोण विभागाने या संदर्भात शुक्रवारी राबविणार?
दर महिन्याला राज्य सरकारला या योजनेचा प्रगतीचा अहवाल सादर करणे त्यांना बंधनकारक असेल.
कधी भरपाई ?
- प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान
हंगाम सुरु असताना प्रतिकूल हवामानामुळे झालेले नुकसान
- पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, परिसर जलमय होणे, भूस्खलन,
- दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग या बाबींमुळे उत्पन्नात होणारी घट
- स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान
- नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान