एनएसईएल घोटाळा,तपासासाठी दोन उपजिल्हाधिकारी दर्जाची पदे

By Admin | Published: May 10, 2017 01:51 AM2017-05-10T01:51:08+5:302017-05-10T01:51:08+5:30

नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल)च्या हजारो कोटींच्या आर्थिक घोटाळ्याच्या तपासासाठी, आता मुंबई आर्थिक

NSEL scam, two deputy collector status posts for investigation | एनएसईएल घोटाळा,तपासासाठी दोन उपजिल्हाधिकारी दर्जाची पदे

एनएसईएल घोटाळा,तपासासाठी दोन उपजिल्हाधिकारी दर्जाची पदे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (एनएसईएल)च्या हजारो कोटींच्या आर्थिक घोटाळ्याच्या तपासासाठी, आता मुंबई आर्थिक गुन्हा शाखेत उपजिल्हाधिकारी दर्जाची दोन पदे निर्माण करण्यात आली आहेत. देशव्यापी घोटाळ्याच्या या प्रकरणातील तांत्रिक माहिती घेण्यासाठी महसुुली वर्गातील पदांना मंजुरी देण्यात आल्याचे, गृहविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
‘एनएसईएल’ या मुंबईस्थित कंपनीचा सर्वेसर्वा जिग्नेश शहाने २००७ ते १३ या कालावधीत देशभरातील ठेवीदारांना ५ हजार ६०० कोटी रुपयांना फसवले आहे. या प्रकरणाचा तपास मुंबईच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. या तपासासाठी उपजिल्हाधिकारी पदाची आवश्यकता असल्याने, मुंबई पोलीस दलातील पोलीस प्रशिक्षण व कल्याण विभागात मंजूर असलेल्या पाच सहायक आयुक्तांपैकी दोन पदे उपजिल्हाधिकारी दर्जासाठी तात्पुरत्या स्वरूपात वर्ग करण्यात आली आहेत.

Web Title: NSEL scam, two deputy collector status posts for investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.