व्याघ्रमृत्यूंच्या चौकशीचे ‘एनटीसीए’चे आदेश

By Admin | Published: July 28, 2016 01:00 AM2016-07-28T01:00:24+5:302016-07-28T01:00:24+5:30

देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणाऱ्या वाघांच्या मृत्यूची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत वाघांचे झालेले मृत्यू शिकारीमुळे झाले की नैसर्गिक, या संदर्भात चौकशी

'NTCA' order for the inquiry into the inquest into the death | व्याघ्रमृत्यूंच्या चौकशीचे ‘एनटीसीए’चे आदेश

व्याघ्रमृत्यूंच्या चौकशीचे ‘एनटीसीए’चे आदेश

googlenewsNext

- गणेश वासनिक, अमरावती

देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणाऱ्या वाघांच्या मृत्यूची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत वाघांचे झालेले मृत्यू शिकारीमुळे झाले की नैसर्गिक, या संदर्भात चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण दलाने (एनटीसीए) व्याघ्र प्रकल्पांंना दिले आहेत.
वाघांची शिकार करून सीमेपार तस्करी होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे मृत्यूची कारणमीमांसा करण्यासाठी एनटीसीएने सूक्ष्म परीक्षण करण्याचे ठरविले आहे. यात व्याघ्रमृत्यूचा व्हिसेरा अहवाल, तपास आणि गुप्तवार्ता मिळविण्याच्या कामात बहुशाखीय दृष्टिकोन ठेवून, शिकाऱ्यांना जेरबंद करणे, गुप्तवार्ता, गुप्तचर विभाग आणि एसआययू या एजन्सीमध्ये सहकार्य ठेवण्यासाठी प्रयत्न आदींवर भर दिला जाणार आहे.

प्रयोगशाळेची उणीव
वाघांचे मृत्यू, शिकार झाल्यानंतर, त्यांचे अवयव, कातडीची तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा व्याघ्र प्रकल्पांकडे नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात बाजू मांडताना वाघांचे अवयव मिळणे आवश्यक असते. मात्र, अवयवांचा अहवाल वेळेवर मिळत नसल्याने, याचा फायदा आरोपींना होत असल्याचे वास्तव आहे. प्रयोशशाळा उभारण्यावर भर दिला जाणार आहे.

वाघांच्या मृत्यूबाबत ‘एनटीसीए’ने समिती गठित केली आहे. ही समिती वाघांच्या मृत्यूची कारणे शोधून केंद्र सरकारला वस्तुनिष्ठ अहवाल सादर करेल. मेळघाटात वाघांच्या मृत्यूंची एनटीसीएचे नागपूर, बेंगळूरचे आयजी, तर दिल्ली येथील डीआयजी चौकशी करतील. तसे पत्रदेखील प्राप्त झाले आहे.’
- दिनेशकुमार त्यागी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.

Web Title: 'NTCA' order for the inquiry into the inquest into the death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.