एनटीपीसी पश्चिम विभाग मुख्यालयाला ‘पीआर पुरस्कार’

By admin | Published: May 21, 2016 02:15 AM2016-05-21T02:15:35+5:302016-05-21T02:15:35+5:30

पश्चिम विभागीय-१ मुख्यालयाला राष्ट्रीय पातळीवर जनसंपर्क विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सलग तिसऱ्यांदा ‘पीआर एमओयू एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ मिळाला आहे

NTPC Western Region Headquarters gets 'PR Award' | एनटीपीसी पश्चिम विभाग मुख्यालयाला ‘पीआर पुरस्कार’

एनटीपीसी पश्चिम विभाग मुख्यालयाला ‘पीआर पुरस्कार’

Next


मुंबई : राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या पश्चिम विभागीय-१ मुख्यालयाला राष्ट्रीय पातळीवर जनसंपर्क विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सलग तिसऱ्यांदा ‘पीआर एमओयू एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ मिळाला आहे. कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सच्या सामंजस्य करारातील उद्दिष्ट्ये वेळेत पूर्ण केल्याबाबत हा पुरस्कार दिला जातो. तर विभागाच्या सोलापूर प्रकल्पाला हाउस जर्नल पुरस्काराच्या कंपनी पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंग यांच्या हस्ते पश्चिम विभाग मुख्यालयाचे अतिरिक्त महाव्यवस्थापक (जनसंपर्क) के. रवींद्रन, उपव्यवस्थापक (जनसंपर्क) क्रिती दत्ता यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी कार्यकारी संचालक सप्तर्षी रॉय, कॉर्पोरेट प्लॅनिंग आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे कार्यकारी संचालक ए.के. अहुजा, पीएमआय विभागाचे कार्यकारी संचालक ए.के. भटनागर, कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक पी.के. सिन्हा उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: NTPC Western Region Headquarters gets 'PR Award'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.