१०८ क्रमांकाच्या हाती जीवनाची दोरी!

By Admin | Published: April 27, 2015 03:25 AM2015-04-27T03:25:46+5:302015-04-27T03:25:46+5:30

रस्त्यावर अपघात घडल्यानंतर अनेकदा जखमी तेथेच पडून राहतात. एक तासाच्या आत त्यांना उपचार न मिळाल्यास अनेकांना जीव गमवावा लागतो.

The number 108 rope of life! | १०८ क्रमांकाच्या हाती जीवनाची दोरी!

१०८ क्रमांकाच्या हाती जीवनाची दोरी!

googlenewsNext

अमोल जायभाये, पिंपरी-चिंचवड
रस्त्यावर अपघात घडल्यानंतर अनेकदा जखमी तेथेच पडून राहतात. एक तासाच्या आत त्यांना उपचार न मिळाल्यास अनेकांना जीव गमवावा लागतो. या एका तासात तातडीने सेवा मिळावी म्हणून शासनाने ‘गोल्डन अवर’ ही १०८ या टोल फ्री क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरू केली. या सेवेने हजारो लोकांना जीवदान दिले आहे.
आरोग्य विभागाने जानेवारी २०१४ मध्ये ही सेवा सुरू केली. यासाठी राज्यात ९३७ रुग्णवाहिका आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये या अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यात नियमित डॉक्टर, व्हेंटिलेटर, वैद्यकीय उपकरणे आदी सुविधा आहेत. कोणत्याही व्यक्तीने दूरध्वनीवरून घटनास्थळाची माहिती दिल्यास काही मिनिटांत रुग्णवाहिका दाखल होते.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात येते. या सेवेचा दररोज सरासरी एक हजार लोकांना फायदा होत असल्याचे आकडेवारी सांगते.
राज्यात मार्चअखेर ३३ लाख १२ हजार ४४८ दूरध्वनी आले. त्यापैकी २ लाख ५१ हजार २४४ कॉल हे तत्काळ सेवेची आवश्यकता असणाऱ्यांचे होते. या कॉलमुळे ४२ हजार ९५६ जणांना मदत मिळाली आहे. या सेवेत ८३ हजार ६७६ गर्भवतींंनाही मदत मिळाली.

Web Title: The number 108 rope of life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.