एसटीच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण घटले

By Admin | Published: April 9, 2016 03:44 AM2016-04-09T03:44:40+5:302016-04-09T03:44:40+5:30

सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांचा प्रवास विनाअपघात व सुरक्षित होण्यासाठी नियमितपणे प्रयत्न करण्यात येतात.

The number of accidental deaths of ST reduced | एसटीच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण घटले

एसटीच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण घटले

googlenewsNext

मुंबई : ‘सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांचा प्रवास विनाअपघात व सुरक्षित होण्यासाठी नियमितपणे प्रयत्न करण्यात येतात. २0१४-१५ वर्षांशी तुलना करता २0१५-१६ या वर्षांत एसटीच्या अपघातांत घट झाली आहे. २0१४-१५मध्ये एकूण ४९५ जण अपघातांत दगावले होते. यामध्ये एसटी प्रवासी, एसटी कर्मचारी व अन्य वाहनांमधील प्रवाशांचा समावेश आहे. २0१५-१६मध्ये ४0७ जण जणांनी जीव गमावला आहे. गेल्या ४ वर्षांत एसटीच्या अपघातांत एकूण १ हजार ८६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
एसटीचे अपघात होऊ नयेत यासाठी चालकांमध्ये महामंडळाकडून जनजागृती केली जाते. दारू पिऊन वाहन न चालविणे, ओव्हरटेक न करणे, जलद गतीने वाहन न चालविण्याबाबत माहिती दिली जाते. एसटी महामंडळाकडून तर अपघात टाळण्यासाठी बसेसना ताशी ६५ किमीचे ‘स्पीड लॉक’ही लावले आहेत. या उपाययोजना करतानाच विनाअपघात प्रवास करणाऱ्या चालकांसाठी महामंडळाने प्रोत्साहन योजनाही सुरू केल्या आहेत. एसटी महामंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपाययोजना केल्याने एसटी बसच्या अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. सरासरी वर्षाला जवळपास ४८५ जण एसटी अपघातात दगावत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये एसटी प्रवाशांच्या अपघातांचे प्रमाण साधारपणे ६९ आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The number of accidental deaths of ST reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.