काेराेना सक्रिय रुग्णांची संख्या ३५ टक्क्यांनी घटली; राज्याच्या आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 02:24 AM2021-02-11T02:24:25+5:302021-02-11T07:05:06+5:30

राज्यात ९ जानेवारी रोजी ५२ हजार ९६० सक्रिय रुग्ण होते. यात मोठ्या प्रमाणात घट होऊन ८ फेब्रुवारी रोजी हे प्रमाण ३४ हजार ७२० वर आले आहे.

The number of active corona patients in state decreased by 35 percent | काेराेना सक्रिय रुग्णांची संख्या ३५ टक्क्यांनी घटली; राज्याच्या आरोग्य विभागाची माहिती

काेराेना सक्रिय रुग्णांची संख्या ३५ टक्क्यांनी घटली; राज्याच्या आरोग्य विभागाची माहिती

Next

मुंबई : कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळाच्या तुलनेत मागील काही दिवसांत राज्यात दैनंदिन रुग्ण व मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे. याशिवाय मागील एका महिन्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात ९ जानेवारी रोजी ५२ हजार ९६० सक्रिय रुग्ण होते. यात मोठ्या प्रमाणात घट होऊन ८ फेब्रुवारी रोजी हे प्रमाण ३४ हजार ७२० वर आले आहे.

टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, अनलॉकचा पुढचा टप्पा आणि आता सर्वसामान्यांसाठीही लोकल सुरू झाल्याने सामान्य नागरिकांनी किमान पुढील सहा महिने तरी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वच्छता राखणे, मास्कचा वापर आणि शारीरिक अंतर राखणे या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, राज्यात सक्रिय रुग्णसंख्या कमी होत आहे, ही बाब दिलासादायक आहे. मात्र, सामान्यांनीही संसर्ग नियंत्रणासाठी प्रयत्न केला पाहिजे. सोबतच तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी सामान्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. लसीविषयी गैरसमज किंवा अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे.

७३ टक्के खाटा रिक्त
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, सध्या शहर, उपनगरात कोरोना नियंत्रणात आहे. यंत्रणा संसर्ग पसरू नये यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, नागरिकांनीही योगदान देऊन मार्गदर्शक नियमांचे पालन करावे. ऑक्‍टोबर, नोव्हेंबरच्या तुलनेत दैनंदिन रुग्णांमध्येह घट झाली आहे. परिणामी, सध्या शहर व उपनगरात कोरोना रुग्णांसाठीच्या ७३ टक्के खाटा रिक्त आहेत.

Web Title: The number of active corona patients in state decreased by 35 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.