राज्यासाठी दिलासादायक बातमी; दिवसभरात नवीन रुग्णांपैकी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 09:07 PM2020-08-03T21:07:01+5:302020-08-03T21:07:13+5:30

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २२ लाख ९८ हजार ७२३ नमुन्यांपैकी ४ लाख ५० हजार १९६ नमुने पॉझिटिव्ह (१९.५८ टक्के) आले आहेत

The number of corona-free patients is higher among new patients throughout the day in Maharashtra | राज्यासाठी दिलासादायक बातमी; दिवसभरात नवीन रुग्णांपैकी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

राज्यासाठी दिलासादायक बातमी; दिवसभरात नवीन रुग्णांपैकी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

Next

मुंबई - राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असून आज दिवसभरात १० हजार २२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८९६८ नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ८७ हजार ०३० रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६३.७६ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४७  हजार १७  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत.

आज निदान झालेले ८९६८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २६६ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९७० (४६), ठाणे- २०३ (५), ठाणे मनपा-२४४ (५),नवी मुंबई मनपा-३२२ (७), कल्याण डोंबिवली मनपा-२४७ (२),उल्हासनगर मनपा-५४ (४), भिवंडी निजामपूर मनपा-२३ (२) , मीरा भाईंदर मनपा-१३० (४),पालघर-१३२, वसई-विरार मनपा-२२७ (३), रायगड-२३२ (३), पनवेल मनपा-१७३ (२), नाशिक-११४(३),नाशिक मनपा-३२३ (३), मालेगाव मनपा-२५, अहमदनगर-१८४ (१), अहमदनगर मनपा-१८६ (१), धुळे-१२ (१), धुळे मनपा-१२, जळगाव-२८० (६), जळगाव मनपा-१७३, नंदूरबार-३ (४), पुणे- २३१ (७), पुणे मनपा-७९६ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-७३१ (१३), सोलापूर-२०२(४), सोलापूर मनपा-६२ (१), सातारा-१६३ (१), कोल्हापूर-३९५ (५), कोल्हापूर मनपा-१५६ (४), सांगली-११४ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-३६५ (५), सिंधुदूर्ग-१, रत्नागिरी-३१ (२), औरंगाबाद-८१, औरंगाबाद मनपा-२३७ (३), जालना-१९ (१), हिंगोली-१००, परभणी-१, परभणी मनपा-१०,लातूर-७६(५), लातूर मनपा-३१ (२), उस्मानाबाद-३५ (१), बीड-४१ (१), नांदेड-१२३ (१), नांदेड मनपा-१०३ (४), अकोला-२५ (१), अकोला मनपा-१७ (१), अमरावती- ३७ (२), अमरावती मनपा-६३, यवतमाळ-३ (२), बुलढाणा-५१, वाशिम-८ (१), नागपूर-१०८ (९) , नागपूर मनपा-१७६ (४१), वर्धा-३, भंडारा-७, गोंदिया-६१, चंद्रपूर-१३, चंद्रपूर मनपा-३, गडचिरोली-१०, इतर राज्य १० (३).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २२ लाख ९८ हजार ७२३ नमुन्यांपैकी ४ लाख ५० हजार १९६ नमुने पॉझिटिव्ह (१९.५८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४० हजार ४८६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ००९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.

Web Title: The number of corona-free patients is higher among new patients throughout the day in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.