राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८०,००० पार, दिवसभरात १३९ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 08:19 PM2020-06-05T20:19:34+5:302020-06-05T20:27:15+5:30
राज्यात आज १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे.
मुंबई - निसर्ग चक्रीवादळ शमलं असलं तरी कोरोना प्रादुर्भाव काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून, राज्यात आज कोरोनाच्या २४३६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ८० हजारांच्या पार पोहोचला आहे. तर, आज तब्बल १३९ रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ८०,२२९ एवढा असून मृतांची संख्या २८४९ वर पोहोचली आहे.
राज्यात आज १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार २१५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आज बरे झालेल्या १४७५ रुग्णांसह आतापर्यंत ३५ हजार १५६ रुग्णांना डिस्चार्ज.आज २४३६ नवीन #COVID_19 बाधित रुग्णांची नोंद,राज्याची एकूण रुग्णसंख्या झाली ८० हजार २२९.सध्या ४२ हजार २१५ रुग्णांवर उपचार सुरू-आरोग्यमंत्री @rajeshtope11 यांची माहिती
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 5, 2020
➡सविस्तर वृत्त- https://t.co/ioBqV2bNG9pic.twitter.com/rIvdaMB62x
राज्यात ५ लाख ४५ हजार ९४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ३७५ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार २९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज १३९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ९३ (मुंबई ५४, ठाणे ३०, वसई विरार १, कल्याण डोंबिवली ७, भिवंडी १), नाशिक- २४ (जळगाव १४, नाशिक ३, मालेगाव ८), पुणे- १६ (पुणे १४, सोलापूर २), कोल्हापूर- ५ (रत्नागिरी ५) औरंगाबाद-८ (औरंगाबाद ५, जालना १, परभणी २), लातूर- ३ (लातूर १, उस्मानाबाद १, नांदेड १), औरंगाबाद-१.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७५ पुरुष तर ६४ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १३९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७८ रुग्ण आहेत तर ५३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १३९ रुग्णांपैकी ११० जणांमध्ये ( ७९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८४९ झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी २७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २१ एप्रिल ते २ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ११२ मृत्यूंपैकी मुंबई ४१, जळगाव -१३, ठाणे ३०,कल्याण डोंबिवली -७, मालेगाव -८, रत्नागिरी -५, पुणे- ३, भिवंडी -१, सोलापूर -२, नाशिक २ असे मृत्यू आहेत.