नंबरची बनावटगिरी
By admin | Published: June 9, 2014 11:29 PM2014-06-09T23:29:33+5:302014-06-09T23:29:33+5:30
कोणी कल्पनाही करू शकणार नाही, असे प्रकार प्रत्यक्षात घडवून आणण्याचा प्रकार पुणो प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) उजेडात आला आहे. पिंपरी
Next
>पुणो : बनावटगिरी करण्यासाठी कोण कुठली शक्कल लढवेल, याचा नेम राहिलेला नाही. कोणी कल्पनाही करू शकणार नाही, असे प्रकार प्रत्यक्षात घडवून आणण्याचा प्रकार पुणो प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) उजेडात आला आहे. पिंपरी कार्यालयामध्ये रजिस्टर असलेल्या 3 मोटारींचे क्रमांक वापरून दुस:या मोटारींची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
तीन मोटारी बाहेरगावी नेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याकरिता पुणो प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये अर्ज करण्यात आले होते. त्याची छाननी करीत असताना हा प्रकार उजेडात आला. पिंपरी येथील कार्यालयामध्ये रजिस्टर केलेल्या 3 मोटारींपैकी दोन मोटारी या चेन्नई येथे नेलेल्या आहेत. त्या मोटारींचा क्रमांक वापरून दुस:या मोटारींची कागदपत्रे तयार करण्यात आली. त्याबाबतची नोंदही आरटीओ कार्यालयामध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र मिळवून त्या गाडय़ा दुस:या गावी न्यायच्या होत्या. त्याकरिता त्यांनी आरटीओ कार्यालयामध्ये अर्ज केलेला होता.
कागदपत्रंची छाननी करीत असताना आरटीओतील अधिका:यांच्या ही बनावटगिरी लक्षात आली. त्यामुळे आरटीओची मोठी फसवणूक टळली आहे. आणखी काही गाडय़ांची खोटी कागदपत्रे तयार केल्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नेते परशुराम वाडेकर, दत्ता पोळ, तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते एकनाथ ढोले यांनी याप्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेऊन याच्या चौकशीची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
4वेगवेगळय़ा शकली लढवून शासकीय कार्यालयांमधून बनावट कागदपत्रे तयार करण्याचे अनेक प्रकार वाढीस लागले आहेत. विशेषत: एजंटांना जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून असे प्रकार करून घेताना दिसून येत आहे. बनावटगिरीचे असे प्रकार रोखण्यासाठी यामध्ये दोषी आढळणा:यांविरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी परशुराम वाडेकर यांनी केली आहे.