उद्योगांसाठीच्या परवान्यांची संख्या कमी होणार

By admin | Published: July 31, 2015 02:25 AM2015-07-31T02:25:23+5:302015-07-31T02:25:23+5:30

ज्यात अधिकाधिक उद्योग यावेत यासाठी देण्यात येणाऱ्या परवानांच्या संख्या कमी करण्यात आल्या असून यापूर्वी उद्योग उभारणीसाठी ७६ परवाने घेण्याची गरज होती.

The number of licenses for the industries will be reduced | उद्योगांसाठीच्या परवान्यांची संख्या कमी होणार

उद्योगांसाठीच्या परवान्यांची संख्या कमी होणार

Next

मुंबई : राज्यात अधिकाधिक उद्योग यावेत यासाठी देण्यात येणाऱ्या परवानांच्या संख्या कमी करण्यात आल्या असून यापूर्वी उद्योग उभारणीसाठी ७६ परवाने घेण्याची गरज होती. ती संख्या ४६ पर्यंत आणण्यात आली असून लवकरच ही संख्या २५ पर्यंत करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत दिली.
बांधकाम परवानगीसाठी १६२ दिवसांची मुदत ५० दिवसांवर आणण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या परवान्यांची संख्या १४ वरुन ५ वर करण्यात आली आहे. आता केंद्र शासनाच्या भूमिअधिग्रहण कायद्यानुसार भूसंपादन करण्याची परवानगी राज्य शासनाला मिळाली आहे.
गेल्या ३ महिन्यात असे १५०० भूखंड ताब्यात घेण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे बळकटीकरण करणे, व्यक्तिमत्व विकासामार्फत आजच्या तरुणांना उद्योगधंद्याकडे वळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

Web Title: The number of licenses for the industries will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.