राज्यात कुपोषित बालकांच्या संख्येत तीन पटीने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 08:08 AM2021-09-30T08:08:54+5:302021-09-30T08:09:29+5:30
राज्यभर धडक सर्वेक्षण मोहीम.
रमाकांत पाटील
नंदुरबार : कुपोषण कमी करण्यासाठी शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात योजनांची अंमलबजावणी करूनही राज्यातील कुपोषित बालकांच्या संख्येत तब्बल तीन पटीने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कुपोषित बालकांना दिला जाणारा आहार नेमका कुणाचे ‘पोषण’ करतोय हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या कुपोषित बालकांच्या धडक शोधमोहिमेत एकूण १८ हजार ९१४ अतितीव्र कुपोषित बालके आढळली असून, ही संख्या तीन पटीने वाढली आहे. यात एक हजार ५७८ बालके दुर्धर आजाराने त्रस्त असल्याचे आढळून आले आहे.
लोकमतचा पाठपुरावा
कुपोषित बालकांची धडक आरोग्य सर्वेक्षण मोहीम राबविण्याबाबत ‘लोकमत’ने सुरुवातीपासून पाठपुरावा केला होता. सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्याने मोहीम राबविल्यानंतर कुपोषणाची वास्तव आकडेवारी समोर आली होती. हीच मोहीम राज्यभर राबविण्यासंदर्भात ‘लोकमत’नेही पाठपुरावा केला होता. त्याची दखल महिला बालकल्याण विभागाने घेऊन ती मोहीम राबविण्यात आली.
नंदुरबार ३३६८
जळगाव २६११
औरंगाबाद १३४३
धुळे १२६२
गडचिरोली १०१७
यवतमाळ ९७९
अहमदनगर ८३१
परभणी ७०५
अमरावती ६६४
चंद्रपूर ६६३
गोंदिया ५३९
बीड ५११
रत्नागिरी ३३
सिंधुदुर्ग ८६
सांगली ५२
कोल्हापूर ३८
सोलापूर ८७
मध्यम कुपोषित व अतितीव्र कुपोषित अर्थात सॅम व मॅम बालकांची काळजी घेण्याची आवश्यकता असून, तशी सूचना आरोग्य विभागाला केली आहे.
रुबल अग्रवाल, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना