म्हाडा अर्जदारांची संख्या दीड लाखावर

By admin | Published: July 24, 2016 03:23 AM2016-07-24T03:23:52+5:302016-07-24T03:23:52+5:30

म्हाडाच्या ९७२ घरांसाठी शनिवारी अखेर रात्री नऊवाजेपर्यंत सव्वा लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. तर अर्जदारांची संख्या दिड लाखांच्या पुढे पोहचली असून, अनामत रक्कम

The number of MHADA applicants is one and half | म्हाडा अर्जदारांची संख्या दीड लाखावर

म्हाडा अर्जदारांची संख्या दीड लाखावर

Next

मुंबई : म्हाडाच्या ९७२ घरांसाठी शनिवारी अखेर रात्री नऊवाजेपर्यंत सव्वा लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. तर अर्जदारांची संख्या दिड लाखांच्या पुढे पोहचली असून, अनामत रक्कम भरलेल्या अर्जदारांची संख्या ७३ हजारांवर पोहचली आहे.
म्हाडाच्या घरांकरिता नोंदणी करता यावी म्हणून २३ जुलै ही शेवटची तारीख होती. आता २५ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत अर्ज भरता येतील. आॅनलाइन अनामत रक्कम भरण्यासाठी अंतिम मुदत २६ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत आहे आणि डीडीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठीची अंतिम मुदत २७ जुलैच्या दुपारी ३.३० पर्यंत आहे.
म्हाडाच्या सोडतीत पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील घरे असून, १० आॅगस्ट रोजी घरांची सोडत काढण्यात येणार आहे. उच्च उत्पन्न गटातील सर्वात महागडी घरे दहिसरमधील शैलेंद्र नगर येथे आहेत. त्यांची किंमत ८३ लाख ८६ हजार एवढी आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील सर्वात स्वस्त घरे मालाड-मालवणी येथे असून, त्या घरांची किंमत ८ लाख १७ हजार एवढी आहे. शनिवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत १,२८,७९० इतकी नोंदणी झाली तर अर्जदार १,५४,००८ नोंदले गेले. (प्रतिनिधी)

Web Title: The number of MHADA applicants is one and half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.