कोरोना प्रतिबंधासाठी डोसची संख्या वाढवावी, राज्याच्या आरोग्य सचिवांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 06:26 AM2023-04-04T06:26:50+5:302023-04-04T06:27:06+5:30

प्रीकॉशन डोस देण्यावर भर द्यावा!

Number of doses should be increased for Corona prevention, State Health Secretary advises | कोरोना प्रतिबंधासाठी डोसची संख्या वाढवावी, राज्याच्या आरोग्य सचिवांच्या सूचना

कोरोना प्रतिबंधासाठी डोसची संख्या वाढवावी, राज्याच्या आरोग्य सचिवांच्या सूचना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोरोना  नियंत्रणासाठी टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, व्हॅक्सिनेट आणि कोविड अनुरूप वर्तन या पंचसूत्रीचा वापर केला जावा. तसेच प्रीकॉशन डोस देण्यावर भर द्यावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना यांनी सोमवारी दिल्या. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

यावेळी आरोग्य आयुक्त धीरजकुमार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. स्वप्निल लाळे, सहसंचालक डॉ गौरी राठोड, सहायक संचालक डॉ. बबिता कमलापूर, उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.

सचिव सोना यांनी सांगितले की, टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. सीटी व्हॅल्यू तीस पेक्षा कमी असणारा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवला जावा. प्रिव्हेंशन डोसची संख्या वाढवावी.

Web Title: Number of doses should be increased for Corona prevention, State Health Secretary advises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.