राज्यात पाण्याच्या टँकरची संख्या दुपटीने वाढली!

By admin | Published: January 12, 2015 03:00 AM2015-01-12T03:00:11+5:302015-01-12T03:00:11+5:30

दुष्काळासोबतच राज्यात पाणीटंचाईची समस्या उग्र झाली असून, महिनाभरात टँकर्सची संख्या दुपटीने वाढल्याचे शासकीय आकडेवरीवरुन स्पष्ट होते़

Number of water tankers increased twice in the state! | राज्यात पाण्याच्या टँकरची संख्या दुपटीने वाढली!

राज्यात पाण्याच्या टँकरची संख्या दुपटीने वाढली!

Next

अकोला : दुष्काळासोबतच राज्यात पाणीटंचाईची समस्या उग्र झाली असून, महिनाभरात टँकर्सची संख्या दुपटीने वाढल्याचे शासकीय आकडेवरीवरुन स्पष्ट होते़ मराठवाड्यात परिस्थिती भयावह असून, विदर्भातील स्थिती मात्र सध्या नियंत्रणात हे.
पावसाळ््यात मराठवाडा आणि विदर्भात सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊ झाल्याने उन्हाळ््यात पाणीटंचाई जाणविणार हे गृहित धरून प्रशासाने सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. डिसेंबरपासूनच राज्यात पाणीटंचाईला सुरुवात झाली.
१ डिसेंबरपर्यंत राज्यात ७८ गावे आणि १५९ वाड्यांमध्ये ७३ शासकीय आणि ५१ खासगी, असे एकूण १२४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. महिनाभरात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. सध्या राज्यात एकूण १५९ गावे आणि २१७ वाड्यांमध्ये २३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ११७ शासकीय आणि ११६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
सर्वाधिक परिस्थिती मराठवाड्यात असून, मराठवाड्यातील ८ जिल्ह्णांत १२0 गावे आणि
३४ वाड्यांना १७३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ५ जिल्ह्णात ८ गावे आणि १९ वाड्यांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागात पाच जिल्ह्णांत २५ गावे आणि १११ वाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. पश्चिम विदर्भातील बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्णात ४ गावांना ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. कोकण आणि पूर्व विदर्भातील स्थिती मात्र फारशी गंभीर नाही.
मात्र पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता येथेही लवकरच टँकरची मागणी होऊ शकते. (प्रतिनिधी)

Web Title: Number of water tankers increased twice in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.